आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात मनसेचा रास्ता रोको, बस फोडली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मनसेचे 12 नगरसेवक असणार्‍या जळगावातही टोलविरोधी आंदोलनात फारसा प्रभाव दिला नाही. शहरातील अजिंठा चौफीलीवर कार्यकर्त्यांना केवळ 20 मिनिटेच रास्ता रोको करून आंदोलन ‘साजरे’ केले. पोलिसांनी ठिकठिकाणी ठेवलेल्या चोख बंदोबस्तामुळे आंदोलनाआधीच मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कोंडी झाली होती.

जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी 11 वाजता सुरु झालेले आंदोलन अवघ्या 20 मिनिटांतच संपले. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणार्‍या 174 आंदोलकांना अटक करुन पोलिसांनी नंतर सोडून दिले. हे आंदोलन संपल्यावर काही कार्यकर्त्यांनी खेडी गावाजवळील महामार्गावर वडनगरीहून जळगावकडे येणारी एसटी बसवर (क्र एमएच 14 बीटी 1601) दगडफेक केली. त्यात बसच्या काच्या फुटल्या. जामनेर तालुक्यातील शंभरावर कार्यकर्त्यांनी जळगाव-औरंगाबाद महामार्गावर पाळधी येथे 10 मिनिटे रास्ता रोको केला.