आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mns President Raj Thackeray Granted Bail By Jalgaon Sessions Court

आरोपी राज ठाकरे कोर्टात 56 मिनिटे उभे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - कायदा सगळ्यांसाठी सारखाच असतो, मग ते दस्तुरखुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे का असेना. जळगावात घडलेल्या जुन्या गुन्ह्यात जामिनासाठी राज यांना सोमवारी जळगावच्या न्यायालयात तब्बल 56 मिनिटे न्यायाधीशांच्या आदेशाची प्रतीक्षा करत सामान्य आरोपीप्रमाणे उभे राहावे लागले.

मुंबई येथे रेल्वेत मराठी मुलांची भरती करण्यात यावी, यासाठी मनसेतर्फे केलेल्या आंदोलनानंतर राज ठाकरेंना अटक करण्यात आली होती. या अटकेचे पडसाद 21 ऑक्टोबर 2008 रोजी संपूर्ण राज्यासह जळगावतही उमटले होते.

याप्रकरणी राज ठाकरेंसह पाच जणांविरुद्ध जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यात वॉरंट बजावल्याने ठाकरे यांची सोमवारी न्यायाधीश ए. बी. होडावडेकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने राज यांना 15 हजारांचा जामीन मंजूर केला. तसेच या खटल्याच्या कामात कायमची गैरहजर राहण्याची परवानगीही दिली.