आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MNS Rasta Roko Agitation In Jalgaon For Electric Bill Rising

वीज दरवाढीविरोधात जळगावात रास्ता रोको

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्य शासनाने केलेल्या वीज दरवाढीविरोधात उद्योजक, शेतकरी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मंगळवारी अजिंठा चौफुली परिसरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक दीड तास खोळंबली होती.
राज्यातील औद्योगिक, व्यापारी व घरगुती वीजदरात सप्टेंबर 2013पासून सरसकट 25 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील औद्योगिक वीजदर दुप्पट झाले आहेत. राज्य शासनाने ही अन्यायकारक दरवाढ रद्द करावी, या मागणीसाठी राज्य वीज ग्राहक व औद्योगिक संघटनेतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. तसेच शेतकरी, उद्योजक व सर्वसामान्य नागरिकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही आक्रमक होत या आंदोलनात सहभागी झाली. आंदोलनाचे नेतृत्व मनसेचे जिल्हा संपर्क अध्यक्ष विनय भोईटे, जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे, जिल्हा सचिव जमील देशपांडे, किरण शेलार, पाचोरा विभागप्रमुख सुरेश राजपूत, उपजिल्हाध्यक्ष नरेंद्र पाटील, डॉ.मनोहर पाटील, डी.एम.पाटील व अनंत जोशी यांनी केले. या आंदोलनात उद्योजकांमध्ये ‘जिंदा’चे अध्यक्ष भुवनेश्वर सिंग, ‘व्ही’ सेक्टरचे अध्यक्ष बबलू भोळे, संतोष इंगळे, प्रदीप ढाके, दीपक खाचणे, तुषार पटेल, किरण जोशी, अभिषेक सिंग सहभागी झाले होते.
दीड तास वाहतूकीचा खोळंबा
आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुकीचा दीड तास खोळंबा झाला होता. आंदोलनानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या आवारात महावितरणचे अधीक्षक अभियंता अशोक शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलन करणार्‍या 185 जणांना अटक
आंदोलनात सहभागी झालेल्या 185 जणांना अटक करण्यात येऊन नंतर त्यांची सुटका करण्यात आली. या आंदोलनात प्रवीण पाटील, भरत सोनवणे, विलास राजपूत, जुगल पाटील, मुकुंदा रोटे, संजय पाटील, दिनेश पाटील, वैशाली विसपुते, नगरसेविका लीना पवार, पार्वती भील, खुशबू बनसोडे, कल्पना बाविस्कर, नितीन नन्नवरे, मिलिंद सपकाळे, संतोष पाटील, संजय चौधरी, चंदन कोल्हे, सुमित कोल्हे, सुनील पाटील सहभागी झाले होते.