आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइलचे अँप्लिकेशन अभ्यासातही फायदेशीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - स्मार्टफोनचे अँप्लिकेशन स्मार्ट आहेतच, शिवाय ते वापरकर्त्यांनाही स्मार्ट बनवत आहेत. हे अँप्लिकेशन डाऊनलोड करणे थोडे कठीण आहे. मात्र, आता त्या त्रासापासूनही मुक्ती मिळणार आहे. कारण आता अनेक नवीन अँप्लिकेशन अगदी सहज-सोप्या पद्धतीने डाऊनलोड करण्याची व्यवस्था केली आहे. शहरातील अनेक विद्यार्थी या अँप्लीकेशनचा वापर करुन आपल्या अभ्यासात सुसूत्रता निर्माण करीत आहेत. यात मेडिकल, इंजिनिअरींग, फाईन आर्टस, मॅनेजमेंट आदी क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आपल्या मोबाईलमध्ये अगदी सहजपणे अँप्लीकेशन डाऊनलोड करण्यात विद्यार्थी आता पटाईत झाले आहेत. केवळ मनोरंजनासाठी अँप्लिकेशन वापरले जात नाहीत तर त्यातून ज्ञान मिळवण्यासह मार्गदर्शनही होत आहे. जीवनातील विविध गरजा भागविण्यासाठीही आता वेगवेगळे अँप्लीकेशन उपलब्ध झाले आहेत.

नोट्सच्या फोटोमधून देवाण-घेवाण

अभ्यासक्रमाच्या नोट्स कॉपी करण्यासाठी, लिहिणे किंवा स्कॅन करण्यासाठी मोबाइलमध्ये ‘ड्रॉइड्स स्कॅनर’ डाऊनलोड करा. मोबाईलने नोट्सचा फोटो काढा. लेरचे व्हिडिओ चित्रीकरण करा. यासर्व गोष्टींना हे अँप्लीकेशन डॉक्युमेंट शीटमध्ये कन्व्हर्ट करेल. त्यानंतर आपण कॉम्प्युटरवरही नोट्सचे वाचन करु शकतो.

विज्ञान झाले सोपे

‘हॅण्डी कॅलसी’ अँप्लीकेशनच्या मदतीने विज्ञानाचे विद्यार्थी इक्वेशन आणि फंक्शन्सचे ग्राफीक्स पाहू शकतात. तसेच ‘मॅथ्स् फॉर्मुला लाइट’, ‘इक्वेशन जिनियस’, ‘इक्वेशन ग्राफ्स’ सारखे अँप मिनिटात गणिताचे प्रo्न सोडवू शकतात. या सारखाच ‘वॉलफ्रेम अँप’ फायदेशीर आहे.

नॉनस्टॉप एंटरटेनमेंट

ऑनलाइन म्युझिक ऐकण्यासाठी ‘सवान’ आणि ‘हंगामा’ हे दोन अँप फायदेशीर ठरतात. गाणे डाऊनलोड करण्यासाठी ट्रॅक 8 आणि एमपी 3 डाऊनलोडर हे उत्तर पर्याय आहे. व्हिडिओ प्ले करण्यासाठी एमएक्स प्लेयर डाऊनलोड उपयुक्त आहे.

अ‍ॅन्ड्राइड शोधण्यासाठीही

अ‍ॅन्ड्राइड अँपमध्ये स्पेशल कोड असतो. मोबाईल हरविल्यानंतर दुसर्‍या फोनवरुन मेल, मॅसेज करावा. हरविलेल्या फोनमध्ये रिंग वाजताना या अँप्लिकेशनच्या मदतीने जीपीएस ट्रॅक करून शोधण्यासाठी मदत होते.

मॅनेजमेंटसाठीही उपयुक्त
मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ऑफिस सुइट 6’ आणि ‘किंग सॉफ्ट’ या सारखे अँप्लिकेशन वापरण्यास महत्त्वपूर्ण आहेत. यांच्या माध्यमातून फोनवर वर्ड, एक्सेल डॉक्युमेंट शीट मेंटेन करण्यासह पीपीटी तयार करता येते. टु डू लिस्ट, फोटो, व्हिडिओ अरेंज आणि इजी ट्रॅक करण्यासाठी ‘एवर्ट’ आणि ‘इएस फाइल एक्सल्पोरर’ बेस्ट ऑप्शन आहे.

मनोरंजनासाठी फायदेशीर
‘मोबाईल गेमिंग अँण्ड टेंपल रन टू’, ‘अँग्री बर्ड’ ‘आयपीएल 6’, ‘हायवे रायडर अँण्ड सबवे सर्पर’ हे उत्तम अँप्लीकेशन्स आहेत. ‘क्युबिक्स’, ‘डायमंड’, ‘डॅश’, ‘डूडल फिट’ आणि ‘कॅन्डी’ यांच्या माध्यामातुनही आपण विविध प्रकारचे गेम खेळू शकतात.

मेडिकल डिक्शनरी
मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टरी भाषा समजण्यासाठी मोठमोठी पुस्तके उघडण्याची आता गरज राहिलेली नाही. ‘मेडिकल डिक्शनरी’ हे अँप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर मेडिकल लॅग्वेज समजण्यासाठी मार्गदर्शन होते.

तारें जमीन पर..
टेलिस्कोप आणि अंतरिक्ष विषयावरील पुस्तकांशिवाय फोनवरून या सर्व गोष्टी सहज सोप्या झाल्या आहेत. त्यासाठी ‘स्काय मॅप’ हे अँप्लीकशन डाऊनलोड करा. फोन आकाशाच्या दिशेने पकडल्यानंतर तारामंडळाची माहिती मिळेल.