आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल फसवणुकीपासून राहा 'दक्ष'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मोबाइलवरून बँक खात्याची माहिती, पिनकोड विचारून फसवणूक केल्याच्या प्रकारांमध्ये दविसेंदविस वाढ होत आहे. या प्रकारावर नियंत्रण आणण्यासाठी जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. यासाठी शहरातील एन.व्ही.टेक्नॉलॉजी या संस्थेने साडेतीन मिनिटांची 'दक्ष' ही डॉक्युमेंट्री तयार केली आहे. यात फसवणुकीपासून कसा बचाव करता येईल, हे दाखवण्यात आले आहे.

गेल्या वर्षभरात अशा प्रकाराच्या फसवणुकींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वेगवेगळ्या प्रकाराच्या मोबाइलवरून फोन करून भामटे बँक खात्याची माहिती विचारून घेतात. त्यानंतर खात्यातून पैसे काढून घेतात. हा सर्व प्रकार कसा रोखावा, यावर ही फिल्म तयार करण्यात आली आहे. यात फसवणूक झाल्याचे नव्हे तर बचाव करण्याच्या दृश्यांवर भर देण्यात आला आहे. असे प्रसंग समोर आल्यास गोंधळून जाऊ नये. समोरच्या भामट्याला कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नये पण सजगतेने संवाद साधून ती माहिती तत्काळ जळगाव पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. फिल्मचे शूटिंग आटोपले असून लवकरच यू ट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअॅप, चित्रपटगृह, बसस्थानक, रेल्वेस्थानकावर प्रदर्शित केली जाणार आहे. हा विषय बँकांशी संबंधित असल्यामुळे आता या प्रकल्पात बँकांनी मदत करावी, असे आवाहन वर्मा यांनी केले आहे.

पोलिस निरीक्षक रायते दिसणार पडद्यावर
फसवणुकीच्याप्रकरणात पोलिस कशी मदत करतील, असे यात दाखवण्यात आले आहे. यात जविंतपणा यावा यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी स्वत: अभिनय केला आहे. व आणि विशेष म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते, श्रीकृष्ण पटवर्धन, प्रदीप बडगुजर आणि जयंत चौधरी यांनी यात अभिनय केला आहे.

मिलिंद गुणाजींचे आवाहन
साडेतीनमिनिटांच्या या फिल्ममध्ये हास्य कलाकार ऐहसान कुरेशी, मिलिंद गुणाजी यांच्याही मुलाखती घेण्यात आल्या आहेत. जळगाव, नाशिक आणि मुंबई या तीन ठिकाणी फिल्मचे शूटिंग झाले आहे. एन. व्ही. टेक्नॉलॉजीचे संचालक नीलेश वर्मा हे या शॉर्टफिल्मचे निर्माता आहेत. समृद्धी पुनीत शर्मा यांनी कथा लिहिली आहे. दिग्दर्शन प्रशांत सोनवणे तर हिरा अॅग्रोचे गिरीश खडके यांनी सहकार्य केले आहे.