आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा, महाविद्यालयात मोबाइल ‘जॅम’!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - उच्च शिक्षण सहसंचालकांच्या आदेशानंतर मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांनी 25 जून रोजी विद्यापीठाशी संबंधित अनुदानित व विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, अध्यापक, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माण, स्थापत्य, सोशल वर्क, होम सायन्स महाविद्यालयांचे प्राचार्य, महाविद्यालयांचे अध्यक्ष आणि सचिवांकडून अभिप्रायाची मागणी केली आहे.

अभिप्रायांचा राज्यभर पसरू पाहणारा हा खेळ रोखण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार विद्यार्थी संघटना आता दंड थोपटून उभी ठाकली आहे. एका व्यक्तीच्या मागणीवरून शिक्षण खाते वेठीस धरले जात असल्याचा आरोप या संघटनेचे सरचिटणीस अँड.अजय तापकीर यांनी केला आहे. संघटनेने टोपे यांना अभिप्रायांचा खेळ सुरू असलेले उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे पत्र तत्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे.

शाळेत मोबाइल वापरावर 2009 पासूनच बंदी

शासनाच्या नियमानुसार, शाळा किंवा कॉलेजात वर्ग सुरू असताना मोबाइल फोन वापरावर बंदी आहे. शाळेचा परिसर आणि वर्गात शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मोबाइल वापरायला 2009 मध्येच बंदी घालण्यात आली आहे. शिक्षकांबद्दल अनेक तक्रारी आल्यामुळे सरकारने ही बंदी लागू केली. अनेक शिक्षक वर्गात वर्ग चालू असताना फोनवर बोलत असतात. त्यामुळे शिकवण्यात अडथळा निर्माण होतो. तसेच विद्यार्थ्यांचे लक्षही विचलित होते. शिवाय वर्गातला वेळही वाया जातो. त्यामुळे शिकवण्याच्या कामाला वेळ कमी मिळतो. तसेच मोबाइल असणे हा मुलांमध्ये नवीन ट्रेण्ड आलेला आहे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक पालक आपल्या मुलांना मोबाइल देत होते. पण मुले त्याचा गैरवापर करताना आढळले. त्यामुळे शाळांमध्ये मोबाइलबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.