आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइलच्या किमती आजपासून 5100 ते 500 ने वाढणार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दोन हजारांहून अधिक किमतीच्या मोबाइल फोनवर 6 टक्के उत्पादन शुल्क लावण्यात आले आहे. यामुळे मोबाइल फोनच्या किमतींत 100 ते 500 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. मात्र, 2 हजार रुपयांपर्यंतच्या मोबाइलवरील उत्पादन शुल्कात कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दोन वर्षांपूर्वी मोबाइल फोनवर (हँडसेटवर) 12.5 टक्के व्हॅट लावण्यात आला होता. इतर राज्यांत सध्या 5 टक्के व्हॅट लागू करण्यात आला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात 7.5 टक्के कर जास्त लावला जात आहे. त्यामुळे शहरात मोबाइलच्या किमतींमध्ये इतर राज्यांपेक्षा 100 ते 500 रुपयांची तफावत जाणवणार आहे.

मोबाइल फोनवरील उत्पादन शुल्कात चारवरून सहा टक्के म्हणजेच दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याने त्याचा बोजा सर्वसामान्य ग्राहकांवर पडणार आहे. दोन सिम कार्ड, टचस्क्रीन आणि अँड्रॉइड किंवा विंडोजबेस्ड हँडसेट्सची मागणी वाढली आहे. बाजारात साधारणत: 600 रुपयांपासून मोबाइल फोन उपलब्ध आहेत. सध्या बाजारात मोबाइल हँडसेटचा पूर्वीचा स्टॉक उपलब्ध असल्याने तो संपेपर्यंत जुन्याच दराने ते विक्री केले जाणार आहेत. मात्र, सोमवारपासून येणार्‍या नवीन स्टॉकवर शुल्क लागू होणार आहे. शहरात 10 हजारांपर्यंतच्या मोबाइल हँडसेटला मोठी मागणी आहे. मात्र, आजपासून या हँडसेट्ससाठी 100 ते 500 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.

हँडसेटवरील कर

कराचा प्रकार कराची आकडेवारी

व्हॅट 12.5 टक्के

एलबीटी 4 टक्के

उत्पादन शुल्क 6 टक्के

अशा असतील किमती

पूर्वीची किंमत नवीन किंमत

3000 - 5000 3200 - 5300

5000 - 7000 5300 - 7300

7000 - 10,000 7300 - 10,500

10,000 - 15,000 10,500 - 15,500

15,000 - 20,000 15,500 - 20,500