आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काऊंटरमधून अलगद मोबाइल चोरणाऱ्यास सहा तासात अटक; सीसीटीव्ही फुटेजमुळे पकडणे शक्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- गोलाणी मार्केटमधील एका दुकानात काऊंटर मधून अलगदपणे मोबाइल चोरणाऱ्या चोरट्यास शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने सहा तासात अटक केली. त्याच्याकडून चोरीचे चार मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. 


सौरभ नंदकिशोर गावंडे (रा.खेडी) असे चोरट्याचे नाव आहे. सौरभने शनिवारी दुपारी ते ३.३० वाजेच्या दरम्यान गोलाणी मार्केटमधील रिद्धी-सिद्धी मोबाईल या दुकानातून एक मोबाईल चोरी केला होता. दुकानाच्या काऊंटरमध्ये ठेवलेला मोबाईल त्याने अलगद काढून घेतला होता. दुकान मालक अमित तुलसानी यांनी शहर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. तसेच गोलाणी मार्केटमधील काही दुकानांच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेज देखील मिळवले होते. मोबाईल चोरीस गेला त्या वेळी मार्केटमध्ये संशयास्पदरीत्या फिरत असलेला सौरभ दिसून आला. पोलिसांनी त्याची माहिती काढण्यास सुरूवात केली होती. शहर पोलिस ठाण्याचे विजयसिंग पाटील, मोहसीन बिराजदार, प्रणेश ठाकूर, सुधीर साळवे अक्रम शेख यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून सौरभ याला रात्री वाजता नवीपेठ परिसरातून अटक करण्यात आली. रविवारी त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


पळून जाण्याचा प्रयत्न 
दुपारीचोरी केल्यानंतर देखील सौरभ शहरातच थांबून होता. तो नवीपेठ परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने नवीपेठ भागात शोध सुरू केला. पोलिस मागावर असल्याचे लक्षात येताच सौरभने पळून जाण्याचा प्रयत्न केला. काही मिनीटातच पोलिसांनी त्याला पकडून पोलिस ठाण्यात नेले. 

बातम्या आणखी आहेत...