आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mobile Sellar Beat To Municipal Corporation Officer

मोबाइल विक्रेत्यांकडून मनपा कर्मचाऱ्यांना मारहाण, नेहमीच्या दबंगगिरीचा त्रास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गोलाणी मार्केटमध्ये साफसफाई मोहीम सुरू असताना अडथळा ठरणारे वऱ्हांड्यातील अतिक्रमण काढणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना मोबाइल विक्रेत्यांकडून संघटितरीत्या मारहाण करण्यात आली. शुक्रवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आयुक्तांच्या आदेशानंतर दुकानांची तपासणी सुरू झाली आहे. गैर ताबा दुकानांना सील ठोकण्याचे आदेशही या वेळी देण्यात आले आहेत.

शहरातील मोबाइल मार्केट अशी ओळख निर्माण झालेल्या गोलाणी मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांत विक्रेत्यांकडून ग्राहकांना मारहाणीचे प्रकार वाढले असून असाच अनुभव थेट कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिका प्रशासनाला आला. हुतात्मा दिनाचे औचित्य साधत महापालिका, आयएमआर कॉलेज गांधीतीर्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गोलाणी मार्केटमध्ये स्वच्छता अभियान राबवले. सकाळी १० वाजेपासून सुरू झालेल्या या मोहिमेत सुमारे १०० स्वयंसेवक सहभागी झाले होते. या वेळी खुद्द आयुक्त संजय कापडणीस यांच्यासह समाजसेवक तसेच पदाधिकारीही सहभागी झाले होते. प्रभावीपणे मोहीम सुरू असताना गोलाणी मार्केटमधील वऱ्हांड्यात दुकानदारांनी ठेवलेले सामान, स्टूल बाकांमुळे अडथळा येत असल्याने आयुक्तांनी अतिक्रमण विभागाला व्यत्यय येणाऱ्या सामानाबाबत दुकानदारांना सूचना करणे अथवा जप्त करण्याचे आदेश दिले होते.

विक्रेत्यांनीघातली हुज्जत
आयुक्तांच्याआदेशावरून अतिक्रमण विभागाचे अभियंता जितेंद्र रंधे यांच्या नेतृत्वाखाली गोलाणीत पथक दाखल झाले. त्यांनी ज्या दुकानदारांचे सामान व्हऱ्यांड्यात आहेत, त्यांना सूचना केल्या. काहींनी सामान दुकानात ठेवून घेतले, मात्र जी एफ या विंगमध्ये वैभवलक्ष्मी मोबाइल, जे. जे. मोबाइल, ज्ञानेश्वरी मोबाइल या दुकानदारांनी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. सामान उचलण्यास नकार दिल्‍याने कर्मचाऱ्यांनी स्टूल टेबल जप्त करण्याची कार्यवाही केली असता अचानक एकत्रित येत विक्रेत्यांनी अश्लील शिवीगाळ करत कर्मचारी रवींद्र कदम यांना धक्काबुक्की केली. तसेच अशोक श्रीधर सोनवणे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी केले.

आठजणांना नोटिसा
आयुक्तांच्याआदेशानंतर एलबीटी किरकोळ वसुली विभागाकडून दुकानदारांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू झाली. यात एलबीटी विभागाने चार जणांना ‘ढ’ची नोटीस बजावली आहे. यात मनीष मोबाइल शॉपी, शिवसाई मोबाइल, आकाश मोबाइल, साईसागर मोबाइल यांच्याकडून कागदपत्र मागवले. तर दुकानांमध्ये अंतर्गत फेरबदल करणे, गाळा दुसऱ्याला वापरायला देणे, शॉप अॅक्ट परवाना नसणे, कराराची माहिती देणे या कारणांसाठी चार जणांना नोटीस बजावली. यात विक्रम जवाहर लालवानी, शत्रुघ्न साहित्य, नंदलाल विष्‍णुलाल पोपली, हरीशमल विष्‍णुमल पोपली यांना नोटीस बजावण्यात आली आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांनी तपासणी सुरू करताच दुपारी पटापट दुकाने बंद करत दुकानदारांनी पळ काढला होता. सायंकाळी काही विक्रेत्यांनी पालिकेत अधिकाऱ्यांची भेट घेऊन माफी मागितल्याचेही सांगण्यात आले.