आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइलच्या दुकानात चाेरीचा प्रयत्न फसला, काेर्ट चाैकात 20 दिवसांतील दुसऱ्यांदा चाेरीची घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शिवतीर्थ मैदानासमाेरील अंतरीक्ष भवन या मोबाइल विक्रीच्या दुकानात चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न मंगळवारी मध्यरात्री फसला. या दुकानात गेल्या आठ वर्षांपूर्वी चोरी झाली होती. त्यानंतर दुकानमालकांनी इंटरनल लॉक लोखंडी पट्ट्या बसवल्या होत्या. त्यामुळे मंगळवारी रात्री चोरट्यांना दुकानात शिरता आले नाही. काेर्ट चाैक परिसरात २० दिवसांतील ही दुसरी घटना आहे. 
 
काेर्ट चाैकजवळील शिवतीर्थ मैदानासमाेर विश्वास दीक्षित यांच्या मालकीचे अंतरीक्ष भवन हे दुकान आहे. मंगळवारी रात्री ८.३० वाजता दीक्षित दुकानात काम करणारे संजय चौधरी यांनी दुकान बंद केले. त्यानंतर रात्री चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे एका बाजूचे कुलूप छिन्नीच्या साह्याने तोडले. मात्र आतूनही कुलूप लावलेले असल्यामुळे चोरट्यांना शटर उघडता आले नाही. त्यामुळे आल्या त्या पावलांनी चोरटे माघारी फिरले. त्यामुळे दुकानातील पैसे, मोबाइल इतर ऐवज सुरक्षित राहिला. 
 
सकाळी १० वाजता चौधरी दुकान उघडण्यासाठी आले तेंव्हा त्यांना दुकानाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यामुळे त्यांनी याविषयी दीक्षित यांना माहिती दिली. त्यानंतर सायंकाळी वाजता दीक्षित यांनी शहर पोलिस ठाण्यात माहिती दिली.
 
लगेच दोन पोलिसांनी दुकानात येऊन चौकशी केली. तसेच या दुकानाच्या शेजारील पतपेढीच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासण्यात येणार असल्याची माहिती दीक्षित यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. 
 
गेल्या वर्षीही प्रयत्न 
गेल्यावर्षी २५ जानेवारी २०१६च्या रात्री चोरट्यांनी दीक्षित यांच्या दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी चोरट्यांनी ट्रक आणून दुकानाच्या बाहेर उभी केली होती. त्यानंतर कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. पुढच्या शटरमधून आत जाता आले नाही म्हणून मागच्या बाजूने प्रयत्न केला; पण, शेजारी राहणाऱ्यांना आवाज आल्यामुळे त्यांनी घरातील दिवे लावून आरडा-ओरड केली. त्यामुळे चोरट्यांनी पळ काढला होता. तसेच वर्षांपूर्वी दीक्षित यांच्या दुकानात चोरी झाली होती. त्या वेळी चोरट्यांनी १० मोबाइल चोरून नेले होते. त्यानंतर दुकानमालकांनी दुकानाला इंटरनल लॉक लोखंडी पट्ट्या बसवल्या होत्या. 
 
२० दिवसांत दुसरी घटना 
अंतरीक्षभवनपासून काही अंतरावरच त्याच बाजूला असलेल्या सुधाकर राजेश पाटील यांच्या मालकीच्या संजीवनी मेडिकल येथे फेब्रुवारीच्या रात्री चोरी झाली होती. यात चोरट्यांनी ४० हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. २० दिवसांतच चोरट्यांनी पुन्हा याच परिसरात चोरीचा प्रयत्न केला आहे. 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...