आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवार्ता : मोबाइल चोर निघाला अट्टल घरफोड्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - घरफोडीच्या प्रयत्नात असताना जिल्हापेठ पोलिसांनी संशयावरून एका तरुणाला गुरुवारी रात्री वाजेच्या सुमारास अटक केली. त्याने शहरातून दोन मोबाइल चोरी केल्याची कबुली दिली. त्याचा एक साथीदार मात्र फरार होण्यात यशस्वी झाला.

जिल्हापेठ पोलिसांचे दिलीप पाटील, राजेंद्र मेंढे, रवी नरवाडे, अल्ताफ पठाण, अजित पाटील, जगन सोनवणे यांचे पथक बसस्थानक परिसरात गुरुवारी रात्री वाजेच्या सुमारास गस्तीवर होते. त्या वेळी त्यांना एक तरुण संशयितरीत्या फिरताना आढळला. त्याला हटकले असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्याचवेळी मागे त्याचा एक साथीदार होता. तो मात्र पोलिसांची नजर चुकवून फरार झाला.

जिल्हापेठ पोलिसांनी पकडलेला नूरजा धुलसिंग बारेला (वय २५, रा. धवली, मध्य प्रदेश) त्याच्या साथीदारासह घरफोडी करण्याच्या उद्देशाने जळगावात आल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. त्याचबरोबर दोन मोबाइल चोरल्याचीही कबुली त्यांनी दिली. त्यात २५ ऑगस्टला कालिंका माता मंदिराजवळून रामचंद्रन बालचंद्रन (रा. पद्मालय अपार्टमेंट) यांचा मोबाइल चोरला होता. तो त्याच्याकडून पोलिसांनी हस्तगत केला आहे.

चोराला कोठडी
श्रीरामनगरातीलअंकिता राजकुमार सोलेकर यांच्या घरातून २० एप्रिलला हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरीस गेला होता. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी संजय महाबली पटेल (वय १९, रा. रामेश्वरनगर) याला बुधवारी अटक केली. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत गुरुवारी संपल्याने त्याला न्यायाधीश एस. जे. शिंदे यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. सरकारपक्षातर्फे अॅड. एम. एस. फुलपगारे यांनी तर आरोपीतर्फे अॅड. सत्यजित पाटील यांनी काम पाहिले.