आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोबाइल चोराला एक वर्ष कारावासाची शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- श्रीधर नगरातून मोबाइलचोरी झाली होती. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात २२ ऑगस्ट २०१४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याला गुरुवारी न्यायाधीश संगीता शिंदे यांनी वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

श्रीधरनगरातील सुधीर प्रकाश महाजन यांच्या घरातून खिडकीजवळ ठेवलेल्या मोबाइलची गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात चोरी झाली होती. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी रणसिंग प्रकाशसिंग जुन्नी याला अटक करून त्याच्याकडून मोबाइल जप्त केला होता. या प्रकरणी रणसिंग कारागृहात होता. हा खटला कारागृह न्यायालयात सुरू होता. सरकारतर्फे अॅड. अनिल बागले यांनी साक्षीदार तपासले. सरकारपक्षाचा पुरावा ग्राह्य धरून जुन्नी याला कलम ३८० अन्वये एक वर्ष कारावास आणि हजार रुपये दंड, हा दंड भरल्यास १५ दिवसांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. सरकारपक्षातर्फे अॅड. बागले, अॅड. हेमंत मेंडकी यांनी काम केले.

सुनावणी कारागृहातच
रामानंदनगरपोलिसांनी १९ मे २०१५ला रात्री संशयितरीत्या फिरताना रणसिंग जुन्नी याला अटक केली होती. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ मोबाइल आढळून आले होते. मात्र, त्या मोबाइलचे मालक सापडले नाही. त्यामुळे मुंबई पाेलिस कायदा १२४ प्रमाणे पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. या प्रकरणी रणसिंग सध्या कारागृहात असल्याने त्याच्या खटल्याची सुनावणी कारागृहातच झाली.