आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात माेबाइल, मोटारसायकल लांबवणाऱ्या टाेळ्या सक्रिय, 14 दिवसांत 4 दुचाकी, 3 माेबाइल लंपास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात सध्या दुचाकी अाणि माेबाइलचाेरीच्या घटनांमध्ये माेठ्या प्रमाणात वाढ झाली अाहे. वर्दळीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन माेबाइल व दुचाकीचाेरांच्या टाेळ्या हातसफाई करीत अाहेत. गेल्या १४ दिवसांत शहरात ४ दुचाकी व २ माेबाइलचाेरीच्या घटना घडल्या. याप्रकरणी पाेलिसांच्या हाती अातापर्यंत ३ चाेरटे लागले अाहेत.  
 
शहरात गर्दीच्या, गजबजलेल्या ठिकाणांवरून १४ दिवसांत ४ दुचाकी लंपास केल्याच्या घटना घडल्या अाहेत. त्यात पाेलिसांना तीन चाेरट्यांना पकडण्यात यश अाले अाहे. त्यात २ फेब्रुवारी राेजी प्रतापनगरातील शाेभा हाॅस्पिटलजवळून अशाेक शेनफडू पाटील (रा. धानवड) यांच्या मालकीची दुचाकी (क्र. एमएच-१९/एव्ही-७४३७), ७ फेब्रुवारी राेजी रात्री श्रद्धा काॅलनीतील प्रा. डाॅ. युवराज वाणी यांच्या कंपाउंडच्या गेटचे लाॅक ताेडून चाेरट्यांनी दुचाकी (क्र. एमएच-३२/एस-८५१६), जैन इरिगेशनच्या पार्किंगमधून ८ फेब्रुवारी राेजी समाधान झिपा राठाेड यांच्या मालकीची दुचाकी (क्र. एमएच-१९/सीए-३८६९) व १६ फेब्रुवारी राेजी प्रतापनगरातील श्री स्वामी समर्थ केंद्राजवळून संजय रामभाऊ भुसारी (रा. इंद्रनील साेसायटी) यांच्या मालकीची दुचाकी लंपास केली अाहे.  
 
तीन चाेरटे सापडले : पाेलिसांनी अातापर्यंत एमअायडीसी पाेलिस ठाण्यात ७ राेजी दाखल असलेल्या दुचाकीचाेरीतील सुभाष मराठे, कैलास काेकाटे यांना अटक केली, तर १३ राेजी जिल्हा परिषदेजवळून दुचाकी (क्र. एमएच-१९/बीएफ-२३३६)चाेरीतील प्रमाेद अहिरराव (रा. भाेपाळ) याला अटक केली.

केस नं. १ : बळीरामपेठेत दिवसा माेबाइल हिसकावला
वाल्मीकनगरातील रणजित माणिक सूर्यवंशी (वय २८) साेमवारी सायंकाळी बळीरामपेठेतील शिवाजी चाैकातून माेबाइलवर बाेलत पायी जात हाेता. सायंकाळी ५.१५ वाजता सागर बुक्स डिस्ट्रीब्यूटरजवळ त्यांच्यामागून एक विनाक्रमांकाच्या दुचाकीवर अालेल्या तरुणाने त्यांच्या हातातील माेबाइल हिसकावून पाेबारा केला. याप्रकरणी सूर्यवंशी यांनी साेमवारी रात्री शहर पाेलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जबरी चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

रेल्वेस्थानक परिसरातही माेबाइलचाेर सक्रिय
सम्राट काॅलनीतील गिरीश रामदास शिरसाळे (वय २६) हे १७ फेब्रुवारी राेजी शेगाव येथे जात हाेते. त्या वेळी रेल्वेस्थानक परिसरात त्यांचा माेबाइल चाेरट्यांनी लंपास केला हाेता. याप्रकरणी त्यांनी लाेहमार्ग पाेलिसांत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

एमअायडीसीतही वाढली चाेरट्यांची दादागिरी
एमअायडीसीतील महालक्ष्मी कंपनीतील कामगार रविशंकर साबुलाल गाैतम (रा. उत्तर प्रदेश) हा १३ फेब्रुवारी राेजी सायंकाळी काम संपवून घराकडे जात हाेता. त्या वेळी ट्रायडन स्टील कंपनीसमाेर दुचाकीवर अालेल्या तरुणाने त्याचा माेबाइल हिसकावून नेला हाेता. याप्रकरणी एमअायडीसी पाेलिसांनी प्रशांत पंडितराव साबळे याला अटक केेली.
बातम्या आणखी आहेत...