आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळच्या दोघांवर ‘मोक्का’नुसार कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महाराष्ट्र संघटित गुन्हे निर्मूलन कायद्यानुसार (मोक्का) भुसावळ येथील सराईत गुन्हेगार शेख कलीम शेख सलीम (वय 26) आणि सुरेश ऊर्फ टकल्या राजू पवार (वय 23) यांच्यावर मंगळवारी कारवाई करण्यात आली. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 18 मार्च रोजी शेख व पवार यांच्यावर कारवाई करण्याचा अहवाल अधीक्षक एस. जयकुमार यांच्याकडे सादर झाला. त्यांनी हा अहवाल नाशिकचे महानिरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्याकडे पाठवला. सोमवारी रात्री त्यांनी मंजुरी दिल्यानंतर कारवाई केली.