आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधुनिक उपकरणे, तंत्रज्ञानामुळे श्रमासोबतच होईल पैशांची बचत!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - इलेक्ट्रॉनिक आणि संगणक शास्त्रासह आता सर्वच क्षेत्रात ऑप्टीमायझेशन गरजेचे झाले आहे. किंबहुना दररोजच्या जीवनातील सर्वच क्रिया याच पद्धतीवर आधारित असतात. आधुनिक उपकरणे, तंत्रज्ञानामुळे श्रमासोबतच पैशांची बचत होईल, असे प्रतिपादन आयआयटी दिल्लीचे डॉ.बी.के.पाणीग्रही यांनी केले.

संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑप्टीमायझेशन या विषयावर आयोजित पाच दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात सोमवारी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बी.सी. बियाणी होते. हिंदी सेवा मंडळाचे सचिव डी.डी. शर्मा, प्राचार्य डॉ.आर. पी. सिंग, प्रमुख संयोजक प्रा.मुकेश सिंह, प्रा.एस. बी.ओझा आदी उपस्थित होते. गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘रिसेंट ट्रेंड्स इन ऑप्टीमायझेशन अँण्ड इट्स अँप्लीकेशन इन इंजिनिअरिंग’ या विषयावर सोमवारपासून कार्यशाळेला सुरुवात झाली. या वेळी बोलताना प्रा. पाणीग्रही म्हणाले की, सध्याच्या काळात प्रचंड वेगाने तांत्रिक बदल होत आहेत. मोबाइल आणि टीव्ही या क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाचा अविष्कार आपण पाहत आहोत. या व्यतिरिक्त दुचाकी, चारचाकी वाहने आणि उद्योगधंद्यांमधील उपकरणे यांच्यातही प्रचंड वेगाने बदल होत आहेत. रोबोटक्स अर्थात यंत्र मानव, अंतराळ विज्ञान या क्षेत्रातील बदलही थक्क करणारे आहेत. अभियांत्रिकीच्या सर्वच क्षेत्रात हे बदल प्रत्यक्षात आणण्यासाठी डिझाइन इंजिनिअर्स प्रयत्नशील असतात. ऑप्टीमायझेशन म्हणजेच सध्या अस्तित्वात असलेली उपकरणे, तसेच तंत्रज्ञान यांच्यात उपलब्ध साधनांच्या आधारे काय बदल करता येईल. जेणेकरून निदरेष आणि परिणामकारक व प्रत्यक्षात कार्यशील असलेली नवीन उपकरणे किंवा तंत्रज्ञान विकसित होईल. अभियांत्रिकी क्षेत्रात कोणत्याही तंत्रज्ञानाच्या बदलादरम्यान नवीन उपकरणाची निर्मिती करताना अल्गेरिदम अर्थात पहिल्या पायरीपासूनचे महत्त्व तसेच उत्पत्तीवाढ याबाबतचे विविध टप्पे डॉ. पाणीग्रही यांनी स्पष्ट केले.

कार्यशाळेत यांनी घेतले परिश्रम
संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात सोमवारपासून सुरू झालेल्या या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी प्रा.जी. ए. कुलकर्णी, प्रा. ए. पी. चौधरी, प्रा. डी. डी. पाटील, प्रा. प्रीती सुब्रमण्य्म, प्रा. ए. एस. भिडे, प्रा. जी. के. महाजन, प्रा. डी. जी. अग्रवाल आदींनी सहकार्य केले.

कार्यशाळेचा घ्यावा लाभ
विद्यार्थ्यांनी मूळ अभियांत्रिकी शाखेचा वापर करून प्रगतीपथाकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. प्रचंड वेगाने होणार्‍या तांत्रिक घडामोडींचा आवाका लक्षात घेण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सलग पाच दिवस विद्यार्थ्यांना संगणकीय तंत्रज्ञान आणि ऑप्टीमायझेशन या विषयावर माहिती मिळेल. सर्व शाखेतील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. मार्गदर्शकांनी केलेल्या सूचनांचे विद्यार्थ्यांनी टिपण काढले तर अधिक उत्तम होईल. आर.पी.सिंग, प्राचार्य, गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय, भुसावळ

स्पध्रेच्या युगात टीका
गतिमान कालचक्रात स्पध्रेच्या युगात टिकून राहणे गरजेचे आहे. कोणत्याही तंत्रज्ञानात आपण पुढेच राहावे, असा विचार करणे आजमितीला आवश्यक आहे. संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना पाच दिवसांच्या कार्यशाळेतून तंत्रज्ञानाशी जवळीक साधण्याची पर्वणीच उपलब्ध करून दिली होती. देशातील प्रख्यात तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून पाच दिवस तंत्रज्ञानाचे बाळकडू पाजले जाणार आहे. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी दिशादायक ठरेल. बी.सी.बियाणी, अध्यक्ष, हिंदी सेवा मंडळ