आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोडी लिपीतील ९५० नोंदी जपणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल - संगणकीकरणासाठीयेथील अभिलेख विभागाने फेरफार, ड-पत्रक, जन्म-मृत्यू नोंदी, विविध सनदी क्रमनिहाय लावणे सुरू केल्या आहेत. यात स्वातंत्र्यपूर्व काळातील सन १८८३मधील मोडी लिपीतील तब्बल ९५० नोंदी विभागाला गवसल्या आहेत. अतिशय सुस्थितीत असलेल्या या नोंदींचे वाचनासाठी दुर्दैवाने यावल तहसीलमध्ये मोडी लिपीचा एकही जाणकार कर्मचारी उपलब्ध नाही.

तहसील कार्यालयाच्या आवारातील अभिलेख विभागाच्या कक्षात १५ फूट उंचीचे नऊ खण असलेले भले मोठे कपाट आहे. तालुक्यातील प्रत्येक गावाचे वर्षानिहाय अभिलेख कापडाच्या गाठोडीत बांधून येथे सुरक्षित ठेवले आहेत. गावनिहाय क्रमवारी दिल्याने कोणत्याही नोंदी सापडणे सहज शक्य होते. मात्र, जपणूक करून ठेवलेल्या या नोंदींमध्ये तब्बल ९५०पेक्षा जास्त दस्तऐवज, नोंदी १८८३मधील आहेत. ही महत्त्वाची कागदपत्रे कालांतराने जीर्ण होण्याचा धोका असल्याने विभाग लवकरच त्यांचे संगणकीकरण करणार आहे.
यावलमधील अभिलेख विभागात या पद्धतीने ब्रिटिशकालीन नोंदी सांभाळून ठेवण्यात आल्या आहेत. त्यात मोडीतील कागदपत्रे आहेत.

येथील स्वातंत्र्यपूर्व तथा ब्रिटिशकालीन मोडी लिपीतील सर्व दस्तावेज सुरक्षित आहेत. प्रामुख्याने १८८३च्या काळातील हे ९५० दस्त आम्ही अत्यंत काळजीपूर्वक हाताळत असून लवकरच त्यांचे स्कॅनिंग करणार आहोत. नितीनतायडे, अभिलेखपाल, यावल

आधीच कार्यालयात कर्मचारी कमी आहेत. सोबतच ७/१२ संगणकीकरण, राजस्व अभियानांतर्गत शालेय स्तरावर शिबिर घेणे सुरू केले होते. कर्मचा-यांवर वाढलेल्या कामाच्या ताणामुळे कुणालाही प्रशिक्षणास जाणे शक्य झाले नाही. विजयकुमारढगे, तहसीलदार

नोंदी आजही सुस्थितीत
ब्रिटिशकाळाततालुक्यातील ८४ गावांतील तत्कालीन परिस्थितीनुसार नागरिकांना रहिवासासाठी शासनाच्या जमिनी कबुलायतद्वारे सनद करून दिल्या जात होत्या. १८८३मध्ये याबाबत मोडी लिपीत नोंदी झाल्या होत्या. या नोंदी आजही सुरक्षित स्थितीत आहे.

प्रशिक्षणात सहभाग नसल्याने अडचणी
पर्यटनसांस्कृतिक कार्य विभागाने जुलै २०१४मध्ये मोडी लिपी प्रशिक्षणासाठी निर्णय घेतला होता. यानुशंगाने लिपिक वर्गासाठी २२ ते ३१ जानेवारी २०१५दरम्यान अमळनेर येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. मात्र, यावलमधून एकही कर्मचारी प्रशिक्षणासाठी गेला नाही. परिणामी, उपलब्ध दस्तऐवजांचे वाचन करणे कठीण झाले आहे.

९० टक्के काम झाले पूर्ण
पुरातननोंदी, दस्तऐवजांची जपणूक करण्यासाठी तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी कर्मचा-यांचे स्वतंत्र पथक नेमले आहे. या पथकाने आतापर्यंत ९० टक्के गावांच्या नोंदी क्रमनुसार लावल्या आहेत. लवकरच त्यांचे स्कॅनिंग होईल, असे सूत्रांनी सांिगतले.