आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अायएमएच्या तक्रारींची माेदींनी घेतली दखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मुदत संपलेल्या महाराष्ट्र मेडिकल काैन्सिलच्या सदस्यांनी निवडणूक घेता त्याचे नियंत्रण अायुर्वेदिक डाॅक्टराकडे साेपवले. याप्रकरणी अायएमएने पंतप्रधान कार्यालयात दिलेल्या तक्रारीची दखल तातडीने घेतली अाहे. राज्याचे मुख्य सचिव यांनी कार्यवाही करावी त्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या पाेर्टलवर द्यावी, अशी सूचना केल्याची माहिती राज्य उपाध्यक्ष डाॅ. अनिल पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे १८ सदस्य असतात. त्यापैकी सदस्य हे सरकार नियुक्त तर सदस्य हे निवडणुकीच्या माध्यमातून अालेले असतात. परंतु सर्व १८ सदस्यांची मुदत संपली अाहे. या सर्व सदस्यांची नियुक्ती करण्याची जबाबदारी शासनाची असते. परंतु निवडणूक घेता शासनाने एमएमसीवर अायुर्वेदिक डाॅ. दिलीप वांगे यांची नियुक्ती केली. अायुर्वेदिक डाॅक्टर अन्य डाॅक्टरांना निर्देश देण्याचा प्रकार अायएमएला मान्य नसल्याने राज्य संघटनेच्यावतीने पंतप्रधान कार्यालयातील पाेर्टलवर तक्रार करण्यात अाली. त्याची दखल घेत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले अाहेत.
बातम्या आणखी आहेत...