आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाेपाळमध्ये जॅकीचा खून, बंदाेबस्त तैनात; बारसे खून प्रकरणात सुटलेला हाेता जामिनावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर रोड भागात तैनात आरसीपी प्लाटूनची व्हॅन. - Divya Marathi
जामनेर रोड भागात तैनात आरसीपी प्लाटूनची व्हॅन.
भुसावळ - येथील वाल्मीक नगरातील रहिवासी तथा माेहन बारसे खून प्रकरणातील संशयित जॅकी ऊर्फ जगदीश इंदर पथराेड (वय ३८) या युवकाचा मंगळवारी मध्यरात्री भाेपाळमध्ये खून झाला. या घटनेची माहिती शहरात मिळताच खबरदारीचा उपाय म्हणून जामनेर राेड, वाल्मीकनगर परिसरात पाेलिसांची गस्त वाढवून काही ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला. 
 
बारसे यांच्या खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जॅकीला ३ जुलै २०१५ नंतर अटक झाली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली. मात्र, त्याला जिल्हाबंदीचे आदेश बजावण्यात आले. तेव्हापासून ताे भाेपाळमध्ये राहत होता. मे महिन्यात जिल्हाबंदीचे अादेश शिथिल करण्यात आले होते. मृत जॅकीविरुद्ध बाजारपेठ शहर पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल अाहेत. पाेलिसांनी गुन्ह्यांची माहिती काढणे सुरू केले आहे. गुरुवारी सकाळी मृतदेहावर भुसावळात अंत्यसंस्कार होतील.
 
डाेळ्यात फेकली मिरची पूड : भाेपाळमधील गौतम नगरात जॅकी राहत हाेता. परिसरातील महाराणा अपार्टमेंटमधून एका महिलेसह मंगळवारी मध्यरात्री तो रचनानगरकडे दुचाकीने जात हाेता. उड्डाणपुलाजवळ अज्ञात संशयिताने त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकल्याने तो खाली पडला. त्यानंतर संशयिताने त्याच्या गळ्यावर, छातीवर वार केले. त्यातच त्याचा रात्री १३.३० वाजता घटनास्थळी मृत्यू झाला. या घटनेनंतर महिलेने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक धावून आले. त्यामुळे संशयित अंधारात पसार झाला. 
 
असे हाेते गुन्हे दाखल 
जॅकी विरुद्ध सन २००० मध्ये शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला हाेता. तर २००६ मध्ये पालिकेच्या सभेवरून झालेल्या दंगलीतही ताे संशयित हाेता. २०१५ मध्ये माेहन बारसे यांच्या खून प्रकरणात त्याच्यविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तसेच अन्य काही गुन्ह्यांबाबत माहिती जमवण्याचे काम सुरू आहे. 
 
दोघांचा करुण अंत 
माेहन बारसे खून प्रकरणातील संशयित नट्टू चावरिया याचाही १३ जानेवारी २०१६ रोजी बसमध्ये गाेळीबार करून खून झाला हाेता. तर जॅकी पथराेडचाही भाेपाळमध्ये खून करण्यात अाला अाहे. यामुळे दोन जणांचा खून झाल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. 
 
अधीक्षकांनी घेतली माहिती 
भाेपाळमधील घटनेची माहिती मिळताच बाजारपेठचे पाेलिस निरीक्षक चंद्रकांत सराेदे यांनी एक अारसीपी प्लाॅटून पथक वाल्मीकनगरच्या समाेरील जामनेर राेडवर तैनात केले. तर डीबी पथकातील कर्मचारी जामनेर राेड, वाल्मीकनगरमध्ये गस्त करत आहेत. सहायक पाेलिस अधीक्षक नीलाेत्पल यांनीही घटनेची माहिती घेतली. 
बातम्या आणखी आहेत...