आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेविकेच्या मुलांना विनयभंगप्रकरणी अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सुप्रीम कॉलनीत गेल्या काही दिवसांपासून दारू विक्रेते व नगरसेवकांच्या मुलांमध्ये सुरू असलेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी विद्यमान नगरसेविकेच्या दोन्ही मुलांना अटक करण्यात आली असून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर आपल्याच सुनेची छेड काढल्याची तक्रार नगरसेविकेने पोलिसांकडे दिली आहे.
सुप्रीम कॉलनीतील माजी नगरसेवक अण्णा भापसे व विद्यमान नगरसेविका जिजाबाई भापसे यांची मुले सुरेश व चंद्रकांत भापसे यांनी गुरुवारी याच परिसरातील 30 वर्षीय महिलेला शिवीगाळ केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल होता. त्यानंतर रात्री 9.30 वाजेच्या सुमारास दोघांना तक्रार केल्याची माहिती कळल्याने त्यांनी महिलेला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात दोघांना अटक करून शुक्रवारी न्यायाधीश एस.बी.देवरे यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या वेळी आरोपींतर्फे अँड.जयवर्धन शिंदे यांनी काम पाहिले.
नगरसेविका भापसेंची तक्रार
गेल्या काही वर्षांपासून सुप्रीम कॉलनीत सुरू असलेल्या दारू विक्रेत्यांकडून महिलांना त्रास देण्याचा प्रकार सुरू असून त्याचा फटका नगरसेविकेच्या सुनेला बसला आहे. यासंदर्भात जिजाबाई भापसे यांनी पोलिस प्रशासनाकडे लेखी तक्रार करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
कारवाईची मागणी
निवेदनात म्हटले आहे की, या परिसरात अवैध दारू दुकाने सुरू आहेत; पण अलीकडच्या काळात काही महिला दारू विक्री करतात. त्यांची मुले महिलांची छेडछाड करणे, चोर्‍या करणे, मजूर वर्गाची रस्ता लूट करणे, आदी कामे करत असल्याचेही म्हटले आहे. पूनम दीपक बागडे याने कॉलनीत भीतीचे वातावरण निर्माण केले असून महिलांची छेडछाड करणे व चोर्‍या करण्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याचेही म्हटले आहे. तीन दिवसांपूर्वी सुनेची छेडछाड केल्याची तक्रार करत गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.