आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिघांनी केला महिलेचा विनयभंग अन् मारहाण, डांभुर्णीत दोन गटांत वाद; परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल : तालुक्यातील डांभुर्णी येथे गुरांच्या सामाईक वाड्याचे कुलूप तोडल्याच्या कारणावरून झालेल्या वादात परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात एका गटाने ४१वर्षीय महिलेचा विनयभंग, मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याने तिघांविरुद्ध, तर दुसऱ्या गटाकडून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 
 
डांभुर्णी येथील ४१वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी दुपारी वाजेच्या सुमारास गावातील रहिवासी उमेश फालक, पद्माकर फालक पुष्पा फालक या तिघांनी सामाईक वाड्याचे कुलूप तोडल्याच्या कारणावरून घरात घुसून मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देत विनयभंग केला. याप्रकरणी यावल पोलिसांत दाखल गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक योगेश तांदळे, हवालदार संजीव चौधरी करीत आहेत. 
 
दुसऱ्या गटाकडून पद्माकर फालक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुलूप तोडण्याच्या कारणावरून सुवर्णा फालक हिने फरशीचा तुकडा तोंडावर मारून फेकत दुखापत केली. सोबतचे हेमराज फालक (जळगाव), हेमंत नारखेडे भादली येथील अन्य एक या तिघांनी शिवीगाळ मारहाण केली. या गुन्ह्याचा तपास हवालदार सुनील तायडे करीत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...