आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाच्या सरी पडताच शहरामध्ये वीज गूल, मान्सून दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात शनिवारी रात्री १०.४५ वाजता पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू हाेताच काही उपनगरांसह अनेक ठिकाणी वीज गूल झाली. तर शुक्रवारी रात्रीही पाऊस झाल्याने वीज गायब झाली होती. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

अरबी समुद्राएेवजी बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यांनी विदर्भमार्गे खान्देशातून उत्तरेची वाट धरल्याने शनिवारची पहाट जळगावकारांसाठी विशेष उत्साहाची ठरली. मुंबईत दाखल हाेणारा मान्सून चार-अाठ दिवसांत जळगावात येताे, अंदाज काहिसा फाेल ठरवत मान्सूनचे जिल्ह्यात अागमन झाले असून पाऊस मान्सूनचा असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले अाहे.

मान्सूनच्या अागमनासाठी हवामान खात्याकडून देखील कधी अाठवडा तर कधी दिवसांचा अंदाज वर्तवला जात हाेता. शुक्रवारी दिवसभर उकाडा हाेता; या दिवशी तापमान ४० अंशांपुढे होते. त्यात काहीशा ढगांनी घामाच्या धारा फाेडल्याने पाऊस लवकर येईल, असे कुणालाही वाटले नाही. अखेर हवामान खात्याचा अंदाज खाेटा ठरवत मराठवाडा अाणि मध्य महाराष्ट्राला वळसा घालून मान्सून विदर्भमार्गे जिल्ह्यात दाखल झाला. रात्री १.३० वाजेनंतर जिल्हाभरात जाेरदार पाऊस झाला. जामनेर, भुसावळ, रावेर, यावल, पाचाेरा अाणि जळगाव तालुक्यांत पावसाच्या भिज सरी काेसळल्या. शनिवारी पहाटेपासूनच शहरात पावसाळा सुरू झाल्याचा अानंद रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत हाेता.

त्यानंतर शनिवारीहीदिवसभर ढगाळ वातावरण हाेते. अाकाशात पावसाळी ढग अाणि हवेचा वेग वाढल्यामुळे शहरात दिवसभर अधून-मधून पावसाचे फवारे सुरू हाेते. सायंकाळी वाजेनंतर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला.

शाळकरी विद्यार्थी सुखावले : ४८ अंशांपर्यंत गेलेल्या तापमानात कशाबशा उन्हाळी सुट्या घालवणाऱ्या विद्यार्थ्यांची यंदा चांगलीच दमछाक झाली हाेती. उच्चांकी तापमानामुळे जूनचा पहिला पंधरवडा उलटूनदेखील विद्यार्थी खेळासाठीही बाहेर पडू शकत नव्हते. शाळा सुरू हाेऊन अवघे दाेन-चार दिवस झाले असताना शुक्रवारी रात्री झालेला पाऊस म्हणजे शाळकरी विद्यार्थ्यांसाठी शनिवारच्या पहाटे सुखद धक्का हाेता.

पहिल्याच पावसात वीजपुरवठा गुल
पहिल्याच तुरळक पावसात सुरळीत वीजपुरवठा करण्यात महावितरण कंपनीला अपयश आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पावसानंतर शहरातील रामानंदनगर, जिल्हापेठ, शिव कॉलनी, पिंप्राळा, महाबळ, विठ्ठलपेठ फीडरवरील वीजपुरवठा खंडित झाल्याने अर्धे शहर अंधारात गेले. याबाबत वीज मंडळाकडे संपर्क साधण्याचा प्रयत्नही फोल ठरला.

जिल्ह्यात ३% पाऊस
शुक्रवारी रात्री जळगावमध्ये ४.८ मिलिमीटर पाऊस झाला. जामनेर तालुक्यात ९.४ मिमी.,भुसावळ ११.६ मिमी, यावल ४.९ मिमी, रावेर १.६ मिमी, मुक्ताईनगर २.३ मिमी, बाेदवड ५.७ मिमी, पाचाेरा ३.१ मिमी, चाेपड्यात २.१ मिमी पाऊस झाला.