आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खान्देशात मान्सूनचे अागमन, मान्सूनने व्यापला राज्याचा ९० टक्के भाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगाव,धुळे, नंदुरबार जिल्ह्यात साेमवारी अनेक ठिकाणी पावसाचे अागमन झाले. येत्या ४८ तासांत मुसळधार पाऊस हाेण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली अाहे. जळगाव शहरात सलग दुसऱ्या दिवशी मृगधारा बरसल्या. सोमवारीही दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास पावसाने शहरात हजेरी लावली. १० ते १५ मिनिटे पाऊस झाला. त्यानंतर सायंकाळी वाजता पाऊस झाला. अमळनेर तालुक्यात रात्री ८.३० वाजता विजांच्या कडकडाटासह एक तास पाऊस झाला. पाराेळा शहरात सायंकाळी ७.३० ते ९.३० वाजेदरम्यान मुसळधार पाऊस झाला. धरणगावात सायंकाळी वाजता जाेरदार पावसाने हजेरी लावली. चाेपड्यातही सायंकाळी पाऊस झाला. धानोरा येथे साेमवारी सायंकाळी वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटात पाऊस झाला. अडावद येथेही पावसाच्या सरी बरसल्या. तसेच धुळे शहरात सायंकाळी एक तास मुसळधार पाऊस झाला. नंदुरबार जिल्ह्यात अनेक ठिकाणी अर्धा तास पाऊस झाला. दाेंडाईचाजवळ वीज काेसळल्यामुळे टाॅवर उद‌्ध्वस्त झाल्याने संपूर्ण जिल्हा अंधारात हाेता.

बहुप्रतीक्षित नैऋत्य मोसमी पावसाने विदर्भातून राज्यात प्रवेश केल्यानंतर अवघ्या ४८ तासांत राज्याचा सुमारे ९० टक्के भाग व्यापला आहे. राज्यात कोकणासह मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा अशा बहुतांश भागात पाऊस सुरू झाल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ४८ तासांत उत्तर अरबी समुद्र, उर्वरित महाराष्ट्र, मध्य प्रदेश, यूपीच्या पूर्व भागात मान्सून दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे.
बातम्या आणखी आहेत...