आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुसलेल्या ढगांनी वाढवली चिंता, रात्री ११ वाजता पावसाच्या हलक्या सरी बरसल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्ह्याभरात दाेन दिवसांपासून निर्माण झालेले ढगाळ वातावरण रविवारी देखील दिवसभर कायम हाेते. रात्री ११ वाजेच्या सुमारास रामानंद, महाबळ, प्रेमनगर, खोटेनगर परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.

जिल्ह्यात अाणि जळगाव शहरात शुक्रवारी रात्री मान्सूनच्या सरी काेसळल्या. शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण कायम हाेते. ९५ टक्के अाकाश ढगांनी व्यापल्याने अार्द्रता ७० टक्क्यांपुढे गेली हाेती. हलक्या हवेच्या झाेतामुळे शहरात दिवसभर पावसाचे थेंब सुरू हाेते. मात्र, रविवारी वाऱ्याचा वेग वाढल्याने ऊन-सावलीचा लपंडाव सुरू हाेता. दुपारी वाजता काही काळ कडक ऊन पडले हाेते. चाळिशीच्या अात अालेले तापमान ३६ अंशांपर्यंत स्थिरावले हाेते. दरम्यान, सायंकाळनंतर पुन्हा पावसाचे वातावरण तयार झाले हाेते. रात्री ११ वाजेच्या सुमारास रामानंद, महाबळ, प्रेमनगर, खोटेनगर परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्यानंतर रात्री १.२० वाजेपर्यंत शहरातील विविध भागात काही ठिकाणी पावसाचा शिडकावा होत होता. विदर्भाकडून अालेल्या मान्सूनने जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये हजेरी लावली तर काही तालुक्यांत अद्याप प्रतीक्षा कायम ठेवली अाहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मध्य उत्तर महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल स्थिती अाहे. त्यामुळे पाऊस लवकरच सक्रिय हाेईल. दरम्यान, जिल्ह्यात पावसाचे अागमन झाल्याने पेरणीच्या तयारीला वेग अाला अाहे.
बातम्या आणखी आहेत...