आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गेलेला पाऊस पोळ्याला आला!, पाणी साचल्याने वाहतूक बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव; प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना शनिवारी पावसाने सुखद धक्का दिला. दुपारी वाजता सुरू झालेल्या जोरदार पावसाने तब्बल ४५ मिनिटे शहराला झोडपून काढले. अनेक ठिकाणी पाण्याची डबके साचली, तर झाडेही उन्मळून पडली. यामुळे अनेक भागातील वाहतूकही विस्कळीत झाली. मात्र, आलेला पाऊस पोळ्याला जातो आणि गेलेला पाऊस पोळ्याला येतो अशी म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. त्याचीही प्रचिती शनिवारी शहरवासीयांनी आली.
गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली होती. यामुळे उन्हाचा तडाखाही जाणवत होता. शनिवारी दुपारी कडक ऊन पडले होते. अवघ्या अर्ध्या तासात वातावरण बदलून वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. शहरातील सामान्य रुग्णालय परिसर, कोर्ट चौक, सरस्वती डेअरी परिसर, एसएमआयटी महाविद्यालय परिसर, बजरंग बोगदा या भागात मोठ्याप्रमाणात पाणी साचले हाेते. त्यामुळे वाहतूकही पूर्णपणे विस्कळीत झाली होती. एसएमआयटी महाविद्यालय परिसरातील नाला ओसंडून वाहू लागल्याने नाल्याकाठच्या काही घरांमध्ये पाणी शिरले हाेते. अजिंठा चाैफुलीजवळ रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना अंदाज येत नव्हता. याठिकाणी धोकादायक वाहतूक करावी लागली.

रिक्षावरझाड कोसळले
वादळामुळेजुने बसस्थानक परिसरात कडूनिबाचे झाड रिक्षावर कोसळले. यात जुने जळगावात राहणाऱ्या लखन चौधरी यांच्या रिक्षाचे (एमएच १९, ७८२३) मोठे नुकसान झाले. शिवाजीनगर, तहसील कार्यालयाजवळ, काव्यरत्नावली चौक येथे झाड पडल्यामुळे रस्ता बंद झाला होता. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहाच्या मागच्या बाजूला वादळामुळे झाडे वाकली. याशिवाय गिरणा टाकी परिसरात विजेचा खांब वाकला. वाल्मीकनगरातून अासोद्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरून दीड फूट उंच पाणी वाहत होते. त्यामुळे तासभर वाहतूक बंद होती.

बजरंगबोगद्यात अडीच फूट पाणी
दरवर्षाप्रमाणेयंदाही शनिवारी ४५ मिनिटांच्या पावसानंतर बोगद्यात सुमारे अडीच फूट उंचीपर्यंत पाणी साचले होते. यातून दुचाकी काढताना चालकांना धोका पत्करावा लागला. काही दुचाकी बंद पडल्याचाही प्रकार घडला. पाऊस थांबल्यानंतर तासभर अशीच परिस्थिती होती. तर सरस्वती डेअरी समोरच्या रस्त्यावरही दीड फुटापर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. मात्र, बऱ्याच दिवसांनी मुसळधार पाऊस झाल्याने नागरिकांना हायसे वाटले.

सफाईझाल्याचा फटका
पावसाळ्यापूर्वीशहरातील नालेसफाई व्यवस्थित झालेली नसल्यामुळे संपूर्ण शहर जलमय झाले होते. एसएमआयटी महाविद्यालयाच्या परिसरात दरवर्षी नाला ओव्हर फ्लो होतो. मात्र तरीही या भागाकडे पाहिजे तसे लक्ष दिले गेले नाही. परिणामी पावसानंतर घरांमध्ये पाणी शिरले. येथील नागरिकांनी "दिव्य मराठी' कार्यालयात फोन करून आपली नाराजी व्यक्त केली.

सुप्रीम कॉलनीत पत्रे उडाली
सुप्रमीकॉलनी भागातील उस्मानीयानगर येथील शेख रफिक इसा मन्यार यांच्यासह पाच ते सहा नागरिकांच्या घरावरील सिमेंटची पत्रे वादळामुळे उडाली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची इजा पोहोचली नाही. यात १५ ते २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. वादळामुळे काही वेळ या भागातील वीजही गूल झाली
याभागात पडली झाडे
रेमंडचौफुली, एमआयडीसी पोलिस ठाणे, एफसीआय गोडाऊन या भागात पाच झाडे पडली.
जुन्या बसस्थानकाजवळ वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळल्याने दबली गेलेली रिक्षा.
बजरंग बोगद्यात पाणी साचल्याने त्यातून मोटारसायकल ढकलून नेताना तरूण
मुसळधार पावसामुळे शहरातील सरस्वती डेअरीजवळ रस्त्यावर साचलेले पाणी.