आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाढतेय ब्राऊर्जसचे विश्व

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - बर्‍याच कालावधीपासून वेब यूर्जसमध्ये इंटरनेट एक्स्प्लोररचाच दबदबा होता; परंतु ‘मोझिला फायरफॉक्स’नंतर अनेक चांगले ब्राऊर्जस समोर आले आहेत. जाणून घेऊ या अशाच काही ब्राऊर्जसविषयी..
इंटरनेटवर वेबसाइट, वेब सर्व्हिसेस आणि वेब अँप्लिकेशन्सचा वापर करण्याचे ब्राऊजर हे एक प्रभावी माध्यम आहे. आज इंटरनेटवर उपलब्ध माहितीपर्यंत पोहोचण्यासाठी एक्स्प्लोररसारखे अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. यात काही जलदगतीसाठी, तर काही संकेतस्थळांसाठी प्रसिद्ध आहेत.

Apple Safari
अँपल सफारी ऑपरेटिंग सिस्टीम बनविणारी कंपनी अँप्पलचा इंटरनेट ब्राऊजर आहे. हा एक ओपन सोर्स ब्राऊजर आहे आणि तो विंडोज व मॅक ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. आकर्षक आणि काम करण्यास अत्यंत सोपे असलेले अँप्पल सफारी एचटीएमएल 5 च्या माध्यमातून फूल स्क्रीन व्हिडिओ, जियोलोकेशन आणि बिंग सर्च इंजिनसारख्या सोयींनी युक्त आहे. येथे वेब पेजच्या जाहिराती आणि फॉरमेटिंग न पाहण्याचीही सुविधा आहे.
डाऊनलोड करा : apple.com/safari/
Opera
ओपेरा ब्राऊजरविषयी नेटिझन्सना फारशी माहिती नाही. हा वेगळा विषय आहे, की या मोफत ब्राऊजरचे आतापर्यंत अनेक संस्करण झाले आहेत. ओपेरा मोबाइल फोनसाठीही उपलब्ध आहे आणि यातील प्रमुख फिचर्समध्ये टॅबयुक्त ब्राऊजिंग, पेज झूम करण्याची क्षमता, डाऊनलोड मॅनेजर, फिशिंग आणि स्पाईवेअर प्रोटेक्शन, मजबूत इनक्रिप्शन आहेत. ब्राऊर्जसच्या विश्वात याची सुमारे साडेचार टक्के भागीदारी आहे.
डाऊनलोड करा : opera.com
Flock
फ्लॉक एक मोफत ब्राऊजर आहे.जर तुम्ही ट्विटर, फ्लिकर, फेसबुक, लिंक्डइन, ब्लॉगर, पिकासासारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर जास्त वेळ देत असाल तर या ब्राऊजरला आजमावून पाहू शकता. याच्या साइडबारवर सर्व वेबसाइटच्या लिंक उपलब्ध आहेत आणि हे इंटरनेट सर्फिंग करताना डाव्या बाजूच्या पॅनलच्या माध्यमातून फेसबुक, लिंक्डइन आदींवरील आपल्या मित्रांशी व ट्विटर अपडेट्सशी संलग्न राहण्याची सुविधाही दिली जाते.
डाऊनलोड करा : flock.com
Maxthon
मॅक्सथॉन फक्त विंडोजवर चालणारा ब्राऊजर आहे. याचे वैशिष्ट्य हे आहे, की सेवासुविधा आणि रंग-रूप आपल्या आवडीनुसार बदलण्याचे स्वातंत्र्यही आहे. जर तुम्ही आपल्या ब्राऊजरमध्ये मेनू आणि बटण पसंत करीत नसाल तर ‘हॉट की’चा वापरही करू शकता. जर हॉट कीदेखील आवडत नसेल तर शब्दावर आधारित कमांड्सचा उपयोग करू शकता. जर तेही आवडत नसेल तर टूलबारचा प्रयोग करा किंवा माऊसनेही ब्राऊजरला डायरेक्शन देऊ शकतात.
डाऊनलोड करा : maxthon.com
Avant Browser
अवंत ब्राऊजर मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्स्प्लोररवरच आधारित आहे; परंतु लूक्स आणि फीचर्सच्या तुलनेने ते अधिक वेगळे दिसते. हे बिलकूल मोफत आहे. यात टॅब्सच्या माध्यमातून एकाच वेळी अनेक वेब पेज उघडले जाऊ शकतात आणि एकापेक्षा अधिक होमपेजही सेट केले जाऊ शकतात. यात पेज झूम करण्याची क्षमता, आरएसएस रीडर, सुमारे दोन डझन स्क्रीन, पॉप-अप विंडोज तथा जाहिराती आदींना रोखण्यासाठी बटणही दिले आहे, ज्यामुळे यूजरचे लक्ष विचलित केले जात नाही.
डाऊनलोड करा : avantbrowser.com
Epic
एपिकमध्ये फायरफॉक्सची वैशिष्ट्ये तर उपलब्ध आहेच, पण त्याचबरोबर यातील काही उपयोगी सुविधाही जोडलेल्या आहेत. जसे वॉलपेपर्स, थिम्स, आयकंस आणि चर्चेत असलेल्या भारतीय वेबसाइट्स तथा पोर्टल्सचे शॉर्टकट. यातील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे इनबिल्ट अँटिव्हायरस सुविधाही आहे. साइडबारवर इंडिक नावाने दिलेल्या आयकनवर क्लिक करताना यूर्जस वेबपेजवर निवडक भारतीय भाषांमध्येही टायपिंग सुरू करू शकतात.
डाऊनलोड करा : epicbrowser.com