आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार माेटारसायकली चाेरणारे दोघे संशयित पाेलिसांच्या जाळ्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्हारुग्णालयातून मोटारसायकल चोरीप्रकरणी पाेलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतल्याने चार माेटारसायकली चाेरल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांना मंगळवारी न्यायाधिशांनी ३० जुलैपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली.
विजय तळेले (रा. पवारनगर) यांची स्प्लेंडर माेटारसायकल (एमएच-१५-एजे-०५८७) मे राेजी जिल्हा रुग्णालयासमोरून चाेरीला गेली हाेती. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पाेलिसात गुन्हा दाखल हाेता. निरीक्षक श्याम तरवाडकर यांना मिळालेल्या माहितीवरून राजेंद्र मेंढे, रवींद्र नरवाडे, जगन साेनवणे, अल्ताफ पठाण, दिलीप पाटील यांच्या पथकाने संजय श्रावण बिऱ्हाडे (रा. समतानगर) भाेमाराम प्रसाद सैनी (रा. खाेटेनगर) यांना साेमवारी रात्री ९.३० वाजता अटक केली. त्यांची चाैकशी केली असता, त्यांनी हिराेहाेंडा (एमएच-१७-एमपी-६७६१), स्प्लेंडर (एमएच-१५-बीएच-३४०४), स्प्लेंडर (एमएच-१५-बीजी-११२३) बजाज पल्सर (एमएच-२०-सीजी-४३०८) चाेरल्याची कबुली दिली. सरकारतर्फे अॅड. हेमंत मेंडकी यांनी काम पाहिले.