आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: पाच महिन्याच्या गरोदर मातेने दोन मुलांसह पुलावरून उडी मारून केली आत्महत्या!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोपडा- चहार्डी येथे ३२ वर्षीय गर्भवती महिलेने आपल्या दोन मुलासह आत्महत्या केल्याची घटना घडील आहे. अनुराधा सिद्धार्थ वारडे असे या महिलेचे नाव असून आत्महत्येचे कारण आद्याप समजू शकले नाही. रविवारी दुपारी बारा वाजता आपला दोन वर्षीय मुलगा आणि चार वर्षीय मुलीसह अनुराधा घरातून निघून गेली. त्यानंतर बुधगाव-जळोद पुलावरून दोन्ही मुलांसह उडी मारून अनुराधाने आत्महत्या केली. घटनेचे माहिती मिळताच गावात दुःखाचे वातावरण पसरले आहे.
 
आंबेडकर नगर चहार्डी येथील रहिवासी अनुराधा सिद्धार्थ वारडे (३२) या महिलेने मुलगी सिध्देश्वरी सिद्धार्थ वारडे (५) व मुलगा जयेश सिद्धार्थ वारडे (२) यांच्यासह बुधगाव जळोद पुलावरून खोल पाण्याच्या डोहात उडी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेत मुलगा जयेशचे शव मिळून आले असून अनुराधा आणि तिची मुलगी सिध्देश्वरी यांचे मृतदेह मात्र आद्याप सापडले नाहीत. तापी नदीतील पाणी गढूळ असल्याने शोधपथकाला रात्री उशिरा पर्यंत माय-लेकींचे मृतदेह सापडले नाही. 

अमळनेर येथील पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी घटनास्थळी येऊन प्रकरणाची चौकशी करत आहेत.  या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात जयेश वारडेच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 अनुराधा वारडे पाच महिन्याची गरोदर असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली आहे. घटना घडल्याचे वृत्त कळताच चहार्डी येथील माजी उपसरपंच दत्तात्रय रमेश पाटील, रघुनाथ वारडे, अनिल वारडे, उदय वारडे, किरण वारडे, नितीन वारडे, यासह आठ ते दहा जण डोहात प्रेत शोधण्यासाठी थांबून आहेत.
बातम्या आणखी आहेत...