आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यातील घटना: आई टाटा करून वळताच मुलगा ट्रकच्या चाकाखाली!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शाळेत मुले घेऊन जाणा-या ऑटो रिक्षाला भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सात वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ट्रक जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. अपघातानंतर ट्रक चालकास पोलिसांनी अटक केली आहे.


शहरातील नॉर्थ पॉइंट या आयसीएसई स्कूलमध्ये दुसरीत शिकणा-या खुशला त्याच्या आई, आजोबांनी सकाळी शाळेत जाण्यासाठी रिक्षात बसवले. त्याला टाटा करून ते घरात वळत नाही तोच पुढच्या चौकात रिक्षाला अपघात होऊन चिमुरडा गतप्राण झाला. खुशला घेऊन जाणा-या रिक्षाला पारोळा रोडने भरधाव जाणा-या ट्रकने धडक दिली. धडक बसताच खुश रिक्षातून खाली पडला. ट्रकचे मागील डोक्यावरून चाक गेल्यामुळे तो जागीच गतप्राण झाला. अपघातानंतर ट्रकचालक मंटू आनंदकिशोर यादव (रा. कोलकाता) हा सहचालक राजकुमार यादवच्या ताब्यात ट्रक देऊन पळाला आणि आझादनगर पोलिस ठाण्यात हजर झाला. संतप्त नागरिकांनी सहचालक राजकुमारला नागरिकांनी पकडून चोप दिला. ट्रकच्या काचा फोडल्या, डिझेलची टाकी फोडून ट्रक जाळण्याचा प्रयत्न केला.


असा घडला अपघात...
चालक शर्मा हे रिक्षातील शेवटचा विद्यार्थी खुश अमित जैन ( 7)
यास बसवून आग्रा रोडने सकाळी 7.40 वाजेच्या सुमारास निघाले. त्याच वेळेस आडव्या दिशेने महापालिकेकडून पारोळा रोडकडे जाण्यासाठी मालवाहू ट्रक भरधाव आला. अचानक समोर आलेल्या वाहनापासून बचाव करण्यासाठी रिक्षाचालकाने तत्काळ बे्रक लावला आणि रिक्षा वळवत असतानाच ट्रकची धडक बसून चालकाशेजारी बसलेला खुश रिक्षातून बाहेर फेकला गेला. खाली पडताच तो ट्रकच्या मागील चाकाखाली येऊन चिरडला गेला.