आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आई, मला जन्म घेऊ दे’ अाता अभ्यासक्रमात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एरंडोल - ‘‘तू जसे पाहिले जग, मलादेखील पाहू दे, सांग अाई बाबांना, मला जन्म घेऊ दे ’’
४०भाषांमध्ये भाषांतरित हाेऊन लाखाे भारतीयांपर्यंत गेलेली प्रा.वा.ना.अांधळे यांची कविता अाता अकरावीच्या अभ्यासक्रमात असणार अाहे. ‘लेक वाचवा’ अभियानाची दखल घेऊन युवकभारती पाठ्यपुस्तकात तिचा समावेश केला गेला अाहे.

येथील गझलकार धरणगाव येथील कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील उपप्राचार्य कवी प्रा. वा. ना. आंधळे २०१०पासून ‘लेक वाचवा’ हेे अभियान राबवत अाहे. सन २००६मध्ये लिहिलेली ही कविता मुंबईतील दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली हाेती. त्यानंतर सन २०१०मध्ये मुंबईतील प्राध्यापकाने या कवितेचे पाेस्टर लावण्याची सूचना केली. त्यानुसार प्रा.अांधळे यांनी १०० पाेस्टर राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये लावले. त्यानंतर या कवितेचा प्रसार जाेरात झाला. मराठीनंतर ती हिंदीत तयार झाली. त्यानंतर इंग्रजी, गुजराथी, तामिळ, कन्नड, बंगालीसह विविध भाषा बाेलीभाषेत प्रसिद्ध झाली. तिचे अातापर्यंत तीन लाखांपेक्षा जास्त पाेस्टर तयार झाले असून अनेक दुकानदारांनी अापल्या दुकानांच्या पिशव्यांवर कविता छापून तिचा प्रसार सुरू केला. काही ठिकाणी सामूहिक विवाह समारंभात कवितेची फ्रेम करून वधू-वरांना दिली जाते तर अनेक कन्या शाळांमध्ये तिचे गायन केले जाते.

मालिकेचे शीर्षक गीत : कीर्तनातून,भेटकार्ड, शालेय वह्यांच्या पृष्ठावरून, महाविद्यालयाच्या नियतकालिकांतून, विविध दिनदर्शिका, कापडी पिशव्यांवर ही कविता देशभर छापली जाते. अाता डी.डी.किसान या चॅनलवर सावित्री एक क्रांती मालिका तयार हाेत अाहे. या मालिकेतील शीर्षक गीत म्हणून या कवितेची निवड केली अाहे. या कवितेचे एक घाेषवाक्य तयार केले अाहे. ‘लेकी तुझ्या हाकेने, खरच कमाल केली, अाई मला जन्म घेऊ दे ४० भाषांमध्ये गेली’

काेरियन, फ्रेंच, रशियन भाषेतही हाेणार भाषांतर
इंटरनेटच्या माध्यमातून या कवितेचा प्रसार जगभरात झाला अाहे. अाता उत्तर प्रदेशातील प्रा. पूनम चाैधरी या कवितेचे काेरियन, रशियन फ्रेंच भाषेत भाषांतर करणार अाहेत. तसेच युनिसेफमध्ये ही कविता जावी यासाठी प्रयत्न सुरू अाहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी खास पत्र लिहून प्रा. अांधळे यांचे या कवितेबद्दल अभिनंदन केले अाहे.