आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासू-जावयाच्या ‘प्रेमलीला’; लग्नासाठी जोडीने पलायन, मुलगी म्हणते नवरा नकोच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- प्रेमप्रकरणात सासू-जावई पळून जाण्याचा प्रसंग शुक्रवारी उघडकीस आला. जळगावातील दूध फेडरेशन भागात राहणारी कमला तिचा जावई सुशील या दोघांनी (दोघांचे नाव बदललेले आहे) हा प्रताप केला आहे.

पाच महिन्यांपूर्वी कमलाच्या मोठ्या मुलीचा विवाह भुसावळ तालुक्यातील सुशीलशी झाला. दरम्यान, विवाहानंतर मुलगी सासरी गेली होती. या पाच महिन्यांत कमला सुशील या दोघांचे सूत कधी जुळले हे कोणालाही माहीत नव्हते. मात्र, गेल्या आठ दिवसांपूर्वी मुलगी माहेरी म्हणजेच जळगावी आली होती; तेव्हा कमलाने तिला हुडको भागातील नातेवाइकांकडे जाण्यासाठी सांगून तिला ३५० रुपयेदेखील दिले.
मुलीला हुडको परिसरात रवाना केल्यानंतर कमलाने घरात कोणीच नसल्याची संधी साधून पलायन केले. दुसरीकडे सुशीलदेखील त्याच दिवसापासून बेपत्ता झाला होता. कमलाच्या पतीने जळगाव शहर पोलिस ठाण्यात जाऊन कमला बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती. सुशीलही बेपत्ता झाल्यामुळे हे दोघे सोबत गेलेत का? असा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला. गेल्या आठ दिवसांपासून कमलाचे पती, मुली, भाऊ, नातेवाईक अनेक गावांना जाऊन शोध घेत होते. अखेर शुक्रवारी रात्री वाजेच्या सुमारास दोघे जळगावात दाखल झाले.

पुढील स्‍लाइडवर वाचा सुशीलच्याघरच्यांनी केली दिशाभूल
बातम्या आणखी आहेत...