आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लेकीं’च्या फुटबॉल टीममध्ये आई खेळतेय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दोन भाऊ अथवा बहिणी एकाच संघात खेळताना आपण पाहिले आहे, पण दोन मुली आणि त्यांची आई चक्क एकाच संघात खेळतात. तोही खेळ म्हणजे पुरुषी वर्चस्वाचा, अर्थात फुटबॉल, असे सांगितल्यास आश्चर्य वाटेल. पण जळगावातील राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत पुण्याच्या ३८ वर्षीय मेव्हिस अॅडम आपल्या लेकींसमवेत मैदानात उतरलेल्या आहेत. खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापक, अशी तिहेरी भूमिका त्या पेलत आहेत.

विप्रो कंपनीत काम करणा-या मेव्हिस यांचे माहेर भुसावळचे.अॅडम यांचे पती ऑल्व्हिन हेही फुटबॉलपटू आहेत. दोन मुली झाल्यानंतर पतीच्या प्रोत्साहनामुळे त्या आठ वर्षांपूर्वी फुटबॉल खेळायला लागल्या. त्यांना १९ वर्षांची मर्लन, १७ वर्षांची म्युरियल व पावणेदोन वर्षांची अॅडेल, अशा तीन मुली व ११ वर्षांचा आयमार नावाचा मुलगा आहे. मर्लन, म्युरियल यांच्यासोबत त्या पुण्याच्या फुटबॉल संघात खेळतात. मुलगाही १२ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या फुटबॉल संघात आहे. त्यालासुद्धा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले आहे.

इच्छाशक्तीनेच शक्य...
मुलगा झाल्यावर ६ महिन्यांनंतर मेव्हिस लगेच खेळायला लागल्या. मनात इच्छाशक्ती असली तर सगळं काही शक्य आहे, असे त्या आवर्जून सांगतात.