आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीस साेडून गेलेल्या अाईचा 3तासांत शाेध, जिल्हापेठ पाेलिसांचे यश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जुन्या बसस्थानकाजवळ असलेल्या रिक्षा थांब्यावरील रिक्षात नऊ महिन्यांच्या बालिकेला रिक्षाचालकास सांभाळण्यास सांगून महिला निघून गेली हाेती. ती महिला परत अालीच नाही. परंतु बालिका रडत असल्याने तेथे गस्तीवर असलेल्या जिल्हापेठ पाेलिसांच्या पथकाने तीन तासांतच शाेध घेऊन बालिकेला अाईच्या ताब्यात दिले.

जुन्या बसस्थानकाजवळ असलेल्या रिक्षा थांब्यावर रविवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास रिक्षाचालक सागर सोनवणे, यशवंत पाटील हे रिक्षा घेऊन उभे हाेते. त्या वेळी एक महिला तिच्या महिन्यांच्या बालिकेला रिक्षात ठेवून पाच मिनिटात येते; ताेपर्यंत लक्ष ठेवा, असे सांगून गेली. काही वेळानंतर बालिका रडायला लागली; त्या वेळी महिला परत अाली नाही हे सागर यशवंत यांच्या लक्षात अाले. त्यांनी मुलीच्या अाईला शाेधले; मात्र ती सापडली नाही.

ती महिला पिंप्राळ्यातील
बालिका सोडून गेलेल्या महिलेचे नाव विमल माेहन साेनवणे (वय २६, रा. पिंप्राळा) असल्याचे समाेर अाले अाहे. परंतु, पती त्रास देत असल्याने कंटाळून मुलीला साेडून दिल्याचे तिने सांगितले. तिच्या कुटुंबीयांनी ती मनाेरुग्ण असल्याचे सांगितल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...