आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mother's Role Of Salman Khan In Maine Pyar Kiya Make Me In Glamor Says Rima Lagu

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘मैने प्यार किया’मुळेच आई भूमिकेला ‘ग्लॅमर’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- विविध चित्रपटांतून ‘आई’ची भूमिका निभावताना मैने प्यार किया या चित्रपटात सलमान खानच्या आईची भूमिका साकारली. त्यात आई ही चांगली मैत्रीण असल्याचे दाखविले. त्यामुळेच आपल्या ‘आई’च्या भूमिकेला ग्लॅमर प्राप्त झाल्याचे रिमा लागू यांनी सांगितले.


मैत्रेय हॉटेल्स अ‍ॅण्ड रिसॉर्ट्स समूहाच्या मैत्रेयाज लज्जत या व्हेज रेस्टॉरंटचे उद्घाटन प्रसिद्ध नाट्य व सिने अभिनेत्री रिमा लागू यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मैत्रेय उद्योगसमूहाच्या अध्यक्षा वर्षा सत्पाळकर, जनरल मॅनेजर सुनील घनाटे, आर्किटेक्ट सुखदा घणानकर, संदीप कुलकर्णी, संजय शिंदे, प्रा. मु. ब. शहा आदी उपस्थित होते. त्यानंतर मनीषा सोमण यांच्याबरोबर मनमोकळ्या गप्पांच्या कार्यक्रमात श्रीमती लागू यांनी चित्रसृष्टीसह खासगी आयुष्यातील अनेक प्रसंग उपस्थितांसमोर मांडले. चित्रपटाचे ग्लॅमर कळायला मला फार उशीर लागल्याची स्पष्ट कबुली त्यांनी दिली. श्रीमती लागू म्हणाल्या की, आपण सुंदर दिसतो हे लोकांनी सांगितल्यावर समजले. घरात आईची कठोर शिस्त असल्याने घरकामाची कधीही लाज बाळगली नाही. हा मराठी मातीचा पायगुण असू शकतो. प्रत्येक मराठी कलाकार ग्लॅमर बाहेर ठेवून घरात प्रवेश करतो, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.