आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन चोरट्याकडून पाच मोटारसायकली जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातूनदुचाकी लंपास करणारा बांभाेरी येथील अल्पवयीन अट्टलचोराच्या मुसक्या जिल्‍हापेठ पोलिसांनी आवळल्या आहेत. त्याच्याकडून पाच दुचाकीही ताब्यात घेतल्या आहेत.

जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांना नवीन बी. जे. मार्केट परिसरात एक मुलगा डुप्लिकेट चाव्या लावून मोटारसायकल चोरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी तत्काळ दिलीप पाटील,जितेंद्र राजपूत, विजय नेरकर, उमेश भालेराव आणि योगेश बोरसे यांच्या पथकाला पाठवून त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याने स्टेडिअम काॅम्प्लेक्स, गोलाणी मार्केट,चिमुकले राम मंदिर, डी-मार्ट भागातून चोरलेल्या पाच मोटारसायकली निमखेडी शिवारातील हनुमान मंिदराच्यामागे लपवून ठेवल्या होत्या.
चोरलेल्या मोटारसायकली
स्प्लेंडरमोटारसायकल एमएच-१९-यू-४९८५, स्प्लेंडर एमएच-२०-बीपी-८३६७, स्प्लेंडर एमएच-१९-एए-५६१२, सीडी िडलक्स एमएच-१९-एबी-६२५१, टीव्हीएस सुझुकी एमएच-१९-एम-१६२६ या पाच मोटारसायकल बांभाेरी येथील अल्पवयीन चोरट्याने चोरल्या होत्या.
दुचाकी चोर जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात