आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोटारसायकलस्वाराची दुभाजकाला धडक, कोयता घेऊन फिरणारा ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मोटारसायकलस्वाराने दुभाजकाला धडक दिल्याने एक जण जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री दहा वाजता अोरियन इंग्लिश स्कूल परिसरात घडली. यातील जखमी हा आपली स्कूटर (एमएच-१९/एन-३३३१) ही घेऊन जात असताना हा अपघात झाला. जखमीस पोलिस अधीक्षकांच्या पथकाने खासगी रुग्णालयात दाखल केले. 
 
प्रतापनगरातून दुचाकी लंपास
पिंप्राळ्यातील इंद्रनील साेसायटीतील संजय रामभाऊ भुसारी यांनी प्रतापनगरातील स्वामी समर्थ केंद्राजवळ लावलेली दुुचाकी (एमएच-१९, बीके-७७७६) चोरीस गेली. 

कोयता घेऊन फिरणारा ताब्यात
वेल्डिंग व्यावसायिकाला धमकी देऊन हातात काेयता घेऊन फिरणाऱ्यास एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी रात्री नऊ वाजता अयोध्यानगरातील सागर शॉपीजवळून ताब्यात घेतले. प्रकाश दत्तात्रय लोहार (वय ५९, आदर्शनगर) याने वेल्डिंग व्यावसायिक वसंत नारायण भोई (वय ५४, हरिविठ्ठलनगर) यांना धमकी दिली. याप्रकरणी प्रकाश लोहार यास कोयत्यासह ताब्यात घेतले, अशी पोलिस उपनिरीक्षक सुनील बागुल यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...