आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक, जैन कंपनीचा कर्मचारी जखमी, डोक्याला मार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महामार्गावरील आहुजानगरजवळ गुरुवारी सायंकाळी वाजेच्या सुमारास जैन इरिगेशन कंपनीतील कर्मचाऱ्याच्या मोटारसायकलला अज्ञात ट्रकने धडक दिली.
बांभाेरी येथील गोपाळ निंबा शिरसाट (वय ३५) हे जैन इरिगेशन कंपनीत ऑपरेटर आहेत. गुरुवारी सायंकाळी वाजेच्या सुमारास शिरसाट हे त्यांच्या मोटारसायकलवरून आहुजानगर येथून जात होते. त्या वेळी मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.
अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार बसला. त्यांना लगेच कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. डोक्याला जबर मार बसल्याने सायंकाळी शिरसाट यांना तत्काळ सिटी स्कॅनसाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, रुग्णालयात येऊन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी
पाहणी केली.
बातम्या आणखी आहेत...