आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक्क पोलिस मुख्यालयातून झाली माेटारसायकलची चाेरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगाव पोलिसमु‌ख्यालयाच्या अधिकृत पार्किंमधून कर्मचाऱ्याची चक्क माेटारसायकल चोरीस गेल्याची घटना मंगळवारी घडली.

प्रबंधक शाखेतील दप्तरी पदावर कार्यरत असलेले अमन पठाण यांनी मंगळवारी सकाळी १० वाजता पार्किंगमध्ये माेटारसायकल (क्र.एमएच- १९, एआर- ३४४५) उभी केली होती. सायंकाळी वाजता ते घरी जाण्यासाठी गाडी घेण्यास गेले पण तेथे गाडी नव्हती. याप्रकरणी त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गाडी चाेरी झाल्याची कच्ची नोंद केली.
माेटारसायकलचोराला अटक
एलसीबीनेबुधवारी शरद गावित या माेटारसायकल चाेरास नवापूर येथून अटक केली. त्याने पांजरपोळमधील रवींद्र काळे यांच्यासह इतर तीन मोटारसायकली काढून दिल्या आहेत.