आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसे, महाजनांवर टीकेची झोड, आंदोलकांच्या प्रमुख मागण्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान मिळावे, यासह अन्य १३ मागण्यांसाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर शिंगाडे मोर्चा काढला. आघाडी सरकारच्या कार्यकाळात कापसाला सात हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याची मागणी करणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर आंदोलकांनी टीका केली. आंदोलनातील राष्ट्रवादीच्या बहुतांश सर्वच नेत्यांनी खडसे- महाजनांवर टीका करत, प्रांताधिकारी कार्यालयासमोर तब्बल पाऊणतास जागरण गांेधळ मांडला.
जामनेर रोडवरील नवशक्ती आॅर्केडपासून राष्ट्रवादीच्या शिंगाडे मोर्चाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल, तापी रोड मार्गाने मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयासमोर धडकला. शिंगाडे मोर्चाच्या अग्रभागी बैलगाडीवर नगराध्यक्ष अख्तर पिंजारी, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे आणि माजी प्रभारी नगराध्यक्ष विजय चौधरी यांनीही घोषणाबाजी केली. प्रांताधिकारी कार्यालयाजवळ मोर्चा आल्यानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर यळकोट.. यळकोट जय मल्हारच्या गजरात गोंधळ मांडण्यात आला. गोंधळाची पूजा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. संबळच्या तालावर गोंधळाचा गजर प्रांताधिकारी कार्यालयात घुमल्यानंतर प्रशासनापर्यंत आवाज पोहोचवण्यात आला. गोंधळातून जय मल्हार पार्टीच्या रेणुकाबाई आगलावे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. माजी नगरसेवक राजेंद्र नाटकर, युवराज पाटील, पोपटराव पाटील उपस्थित होते.

प्रांताधिकारी नसल्याने गोंधळ
आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे उपस्थित नव्हते. यामुळे पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. प्रांताधिकारी जिल्हास्तरीय बैठकीसाठी जळगावला गेल्याचे सांगण्यात आले. पूर्वकल्पना देऊनही प्रांताधिकारी गैरहजर राहिल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. पाणीटंचाई अत्यावश्यक बैठक असल्याचे कारण कर्मचाऱ्यांनी सांगितल्यानंतर आंदोलक शांत झाले. शेवटी प्रांत कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाच निवेदन देण्यात आले.

आधी पदांचे राजीनामे द्या
शहरात राष्ट्रवादीकडून निवडून आलेल्यांनी आधी राजीनामे द्यावे, नंतरच भाजपमध्ये जाऊन निवडणूक लढवून जिंकून दाखवावी. सध्या भाजपचे गुणगान गाणाऱ्यांना भाजपच्या तिकिटावर लोक निवडूनही देणार नाहीत. आधी राष्ट्रवादी नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा, यानंतर खुशाल भाजपमध्ये जावे, अशी कोपरखळी जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील यांनी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी पंचायत समितीचे सभापती राजेंद्र चौधरी यांचे नाव घेता मारली.

Á जिल्हाबँकेचे कर्ज वितरण त्वरित सुरू करावे
Á कृषिपंपाचेवीजबिल, विद्यार्थ्यांना फी माफी
Á टेक्सटाइलपार्क भुसावळात निर्माण व्हावा
Á सततच्यादुष्काळामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी
Á पाणीटंचाईअसलेल्या गावात टँकर सेवा पुरवावी
Á कपाशीलाप्रतिक्विंटल सहा हजार रुपये भाव
Á गुरांसाठीमोफत चारा छावण्या सुरू कराव्या
Áदुष्काळग्रस्त अनुदानातकपाशीचा समावेश

रवींद्र पाटील, तालुकाध्यक्ष : सरकारकुंभकर्णी झोपेचे सोंग घेत आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी विरोधक असताना कापसाला अधिक भाव मिळवून देण्यासाठी तत्कालीन सरकारच्या विरोधात आंदोलने केली होती. मात्र, सत्ताधारी असताना आता त्यांना शेतकऱ्यांच्या वेदना दिसत नाहीत.

विजया पाटील, जिल्हाध्यक्षा : राज्यातीलदुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या राज्य सरकारला दिसत नाहीत. त्यामुळे शासनाला योग्य जागा दाखवण्याची वेळ आली आहे. मेक इन इंडियाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात आला. राज्य शासनाच्या दुटप्पी भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेळोवेळी निषेध नोंदवणार आहे.

योगेश देसले, युवा जिल्हाध्यक्ष : विरोधकांनीबेंबीच्या देठापासून ओरडून कापसाला भाव मिळण्याची मागणी केली होती. आता त्यांचे सरकार किमान साडेसहा हजारांचा भाव देऊ शकत नाही, ही शोकांतिका आहे. शेतकरीवर्गाला शासनाने गृहीत धरले आहे.

कल्पिता पाटील, युवती जिल्हाध्यक्षा : शेतकऱ्यांनान्याय मिळाला नाही तर मंत्र्यांना गावबंदी केली जाईल. झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेस मोर्चा आंदोलनांतून वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी राष्ट्रवादी पेटून उठेल.

विलास पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष : पालकमंत्र्यांच्याकोथळीत कुसळही उगवत नाही. मात्र, त्यांनी शेतीतून कोट्यवधी रुपये कमवले. त्यांनी आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचा मंत्र देऊन किमान लखपती करावे. खडसेंनी उत्पन्नवाढीचा फॉर्म्युला सांगावा.

अॅड.रवींद्रपाटील, पदाधिकारी : सरकारकेळी पीकविमा, ज्वारी खरेदी आदी सर्वच बाबींमध्ये उदासीन आहे. शेतकरी हैराण झाला आहे. सरकारबाबत जनतेत कमालीचा रोष आहे. यासाठी गावनिहाय दौरे करणार आहोत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी राज्यशानापर्यंत पोहोचवण्यात कमी पडणार नाही.

उमेश नेमाडे, माजी नगराध्यक्ष : शेतकरीदेशाचा कणा असल्याचे बोलले जाते. मात्र, याच शेतकऱ्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. राष्ट्रवादी शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव रस्त्यावर उतरेल. त्यासाठी सदैव तत्पर राहू. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अधिक उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

विजय चौधरी, माजी उपनगराध्यक्ष : जिल्ह्यात१६४८ कोटींचे रस्ते बांधकामाला मंजुरी मिळाली, पण शेतकऱ्यांना दमडीही मिळाली नाही. यावरून राज्य शासनाची शेतकऱ्यांप्रती असलेली आपुलकी दिसून येते. दुसरीकडे वयाच्या ७५व्या वर्षीही आमचे नेते शरद पवार शेतकऱ्यांसाठी झटत आहेत. किमान याची शासनाने दखल घ्यावी.

मोहन निकम, पदाधिकारी : राज्यातीलसरकारमुळे केवळ खडसे परिवाराला अच्छे दिन अाले. सर्वसामान्य आणि शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत. हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असून भांडवलदारांसोबत आहे. राज्य शासनाने वेळोवेळी राबवलेल्या धोरणांवर सरकारचा दुटप्पीपणा अनेकवेळा जनतेसमोर आला आहे.