आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार रक्षा खडसेंनी मांडल्या तक्रारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बीएसएनएलतर्फे पुरवण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये अनेक त्रुटींविषयी खासदार रक्षा खडसे यांनी कंपनीचे मुख्य महाव्यवस्थापक उपाध्ये उपमहासंचालक मदन मोहन यांच्याकडे तक्रारी मांडल्या. त्यांनी कॉल ड्राॅपमुळे ग्राहकांना होणारा त्रास दूर करण्यासह नियमानुसार रेडिएशन सोडण्याबाबत आश्वासन दिले.

अनेक ठिकाणी टॉवरची संख्या कमी असल्यामुळे मोबाइलसेवेवर परिणाम होतो. खासगी व्यावसायिकांच्या तुलनेत बीएसएनएलची सुविधा स्वस्त असताना वरील त्रासामुळे ग्राहक वैतागले असल्याचेही खासदार खडसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. टॉवरच्या रेडिएशनमुळे मानवी शरीर पशुपक्ष्यांवरही विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर नीरजा तिवारी यांनी रेडिएशनच्या सूचना पाळणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.