आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव- राष्ट्रवादी कार्यालयात आल्या-आल्या चहाचा ट्रे घेऊन प्रत्येकाला चहा वाटणारा 12-13 वर्षे वयाचा ‘कृष्णा’ चहा घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर गेला. त्याला पाहताच खासदार सुळेंनी त्याच्याकडून चहा घेण्यास नकार दिला. जबाबदार पक्षाच्या कार्यालयातच बालकामगार असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्या मुलाला जवळ बोलावून त्याची चौकशी केली. स्वीय साहाय्यकामार्फत त्याला व्यासपीठावरच आणण्यात आले. कृष्णाची पंधरा मिनिटे त्यांनी चौकशी केल्यानंतर सोबत आलेल्या कार्यकर्त्यांना त्याची व्यवस्था लावण्याच्या सूचना केल्या. महिला मेळाव्यात त्याला व्यासपीठावरच विचारले, ‘तू येथे उपस्थित असलेल्यांपैकी कोणाला ओळखतो?’ त्यावर त्याने पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक आणि डॉ. अस्मिता पाटील यांच्याकडे बोट दाखवत यांना ओळखत असल्याचे सांगितले. दरम्यान, त्याच्या शिक्षणाची जबाबदारी पालकमंत्री देवकरांवर टाकण्यात आली. त्याला चांगल्या शाळेत घालण्याचे सांगत त्याची व्यवस्था लावल्यानंतर मला कळवावे, असेही खासदार सुळे म्हणाल्या.
आश्रमशाळेतील थरारानंतर सोडली शाळा
केकतनिंभोरा आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा खून झाल्यानंतर घाबरून अनेक विद्यार्थ्यांनी शाळा सोडली. आठवीच्या वर्गात शिकत असलेला कृष्णा पवार याने शाळा सोडून जळगाव गाठले. तो मूळचा एरंडोल तालुक्यातील खडका येथील असून, त्याचे आई-वडील बांधकाम मजूर आहेत. एके दिवशी त्याची आई दवाखान्यात गेल्यामुळे तसेच आर्थिक ओढाताण होत असल्यामुळे कृष्णाला त्यांनी दीड हजार रुपये महिन्याने मजूर फेडरेशनसमोरील चहाच्या टपरीवर कामाला लावले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.