आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एमपीएससी: ऐनवेळी केंद्र बदलाच्या सूचनेमुळे उडाला गोंधळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी पोलिस उपनिरीक्षक पदासाठी शहरातील 20 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी देण्यात आलेल्या प्रवेशपत्रावरील केंद्र बदलाचा आदल्यादिवशी उमेदवारांना एसएमएस आल्याने अनेकांनी बदललेल्या केंद्रावर हजेरी लावली; पण त्या ठिकाणीही नंबर नसल्याने त्यांचा चांगलाच गोंधळ उडाला. असे असतानाही परीक्षा सर्वत्र शांततेत झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.

जिल्हाभरातील 5425 उमेदवारांनी परीक्षा दिली. 540 विद्यार्थी अनुपस्थित होते. परीक्षेसाठी 402 कर्मचार्‍यांची नियुक्ती केली होती. स्पर्धा परीक्षेसाठी केंद्रनिहाय 20 केंद्रप्रमुख व समन्वयक अधिकारी यासाठी नियुक्त होते. शहरातील जिल्हापरिषद शाळा, बेंडाळे महाविद्यालय, आर.आर.विद्यालय, केसीई अभियांत्रिकी विद्यालय , देवचंद पाटील, आयएमआर, मिल्लत हायस्कूल, अँग्लो उर्दू हायस्कूल, नूतन मराठा महाविद्यालय, प.न.लुंकड, भाऊसाहेब राऊत विद्यालय, महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय, भगीरथ इंग्लिश स्कूल, बाहेती महाविद्यालय, ए.टी.झांबरे विद्यालयात ही परीक्षा झाली. दरम्यान काही विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र बदलण्यात आले होते. मात्र, त्यांना या विषयीची माहिती एक दिवस आधीच देण्यात आली होती. यामुळे या विद्यार्थ्यांनी दिलेली दोन्ही केंद्र शोधून नंबर असलेल्या ठिकाणी परीक्षा दिली, यामुळे चांगलाच गोंधळ उडाला.