जळगाव : चिंचोलीयेथील ‘त्या’ प्रौढाचा झोपेतच मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा बनाव सोमवारी पोलिसांनी केलेल्या चौकशीत उघड केला आहे. बांधकाम व्यावसायिक अशोक लक्ष्मण पाटील (वय ४७) यांचा रविवारी सकाळी संशयास्पदरीत्या मृत्यू झाला होता.
त्यामुळे मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे येथे पाठवण्यात आला. अहवाल आल्यानंतर त्यांचा मृत्यू श्वास कोंडल्यामुळेच झाल्याचे समजले. पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली असता मृत अशोक पाटील दारू पिऊन नेहमी मारहाण करीत असल्यामुळे आपणच त्यांना मारल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.
अशोक पाटील हे नेहमीच दारू पिऊन दुचाकीवरून पडत असल्याने शुक्रवारीही ते जखमी झाले. त्यानंतर ते घरात येऊन झाेपले. शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याचा बनाव कुटुंबीयांनी रचला होता. त्यामुळे मृत पाटील यांचा तातडीने अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. याबाबत एमआयडीसी पोलिसांना पाटील याचा मृत्यू संशयास्पद असल्याची माहिती मिळाल्याने सहाय्यक पाेलिस निरीक्षक सचिन बागुल यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला.
यामुळे मोठी मुलगी पूनम पत्नी शोभा यांनी शवविच्छेदनास विरोध करून मृतदेह घेऊन गेल्यास अात्मदहनाचा इशारा दिला. मात्र, पोलिसांनी त्यांचे न एेकता मृतदेह जिल्हा रुग्णालयात अाणि त्यानंतर धुळे येथे पाठवला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.
रात्रीतून मृत्यूच्या कारणाचा प्राथमिक अहवाल येताच पोलिसांनी चौकशी सुरू केली. उपविभागीय पाेलिस अधिकारी सचिन सांगळे, निरीक्षक सुनील कुराडे यांनी रात्रभर चौकशी केल्यानंतर पाटील यांचा खून झाल्याचे उघड होऊन संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली.
पुतण्यासोबत भागीदारी : बांधकाम व्यावसायिक अशोक पाटील हे चुलत बहिणीचा पुतण्या रवींद्र पाटील याच्यासाेबत भागीदारीत नांद्रा शिवारात शेती करीत असत. नांद्रा परिसरात रवींद्रकडे २२ एकर शेती अाहे. त्या ठिकाणी अशाेक यांचीही शेती हाेती. त्यामुळे दाेघे भागीदारीने शेती करीत हाेते. त्यामुळे रवींद्रचे अशाेक यांच्या घरी येणे-जाणे वाढले. अशोक यांची माेठी मुलगी पूनम हिचा पती पॅरॅलिसीसमुळे अाजारी असल्याने दाेन वर्षांपासून ती माहेरीच हाेती. त्यामुळे रवींद्रचे अाणि तिचे प्रेम संबंध जुळले.
चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल
पाटीलयांच्या मृत्यूप्रकरणी पत्नी शाेभा अशाेक पाटील (वय ४५), माेठी मुलगी पूनम धनराज डाेइफाेडे (वय २८) पूनमचा प्रियकर रवींद्र संताेष पाटील (वय २८), लहान मुलगी पूजा नितीन ढाकणे (वय २५) यांना पाेलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या विराेधात खुनाचा गुन्हा दाखल केला अाहे.
अशाेक यांना दारूचे व्यसन असल्याने रात्री पिऊन आल्यावर पत्नी शोभा, मुलगा गणेश (वय १४) यांना ते बेदम मारहाण करीत असत. लहान मुलगी पूजा प्रसूतीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून माहेरीच होती. १५ डिसेंबरला तिची प्रसूती झाली. ग्रामस्थांनी वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी केल्यास अशोक त्यांना जास्तीच मारहाण करीत असे. अखेर नेहमीच्या त्रासाला कंटाळून कुटुंबीयांनी अशोक पाटील यांना संपवण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी रात्री अशोक मद्यधुंद अवस्थेत घरी परतला.
पत्नीला शिवीगाळ मारहाण करीतच तो झोपला. मुलगी पूनम हिने रवींद्र पाटील याला बोलावून घेतले, अशोकची पत्नी शोभा, मुलगी पूनम यांनी अशोक पाटील झोपलेले असताना तोंडावर उशा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा प्रतिकार प्रचंड असल्याने रवींद्रने लाटणे गळ्यावर दाबून धरल्याने स्वरयंत्र श्वासनलिका तुटून त्यांचा मृत्यू झाला. अर्ध्या तासात अशोक शांत झाल्यावर रवींद्र निघून गेला. दिवस उजाडल्यावर मुलींनी अाक्राेश करून गाव एकत्र केले. झोपेतच त्यांचा मृत्यू झाल्याचा बनाव केला.