आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगावात एमएस्सीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- भगीरथ कॉलनी येथे विनायक कोल्हे यांच्या घरात भाड्याने राहणार्‍या पराग पाटील या 25 वर्षीय युवकाने मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. पराग हा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एमएस्सीच्या दुसर्‍या वर्षाला शिकत होता. तो मूळचा जामनेर तालुक्यातील गोध्री येथील रहिवासी आहे. परागचे वडील प्रभाकर पाटील हे फत्तेपूर येथील जेडीसीसी बॅँकेत नोकरीला आहेत. पराग शिक्षणासाठी कोल्हे यांच्या खोलीत भाड्याने राहत होता. कोल्हे यांनी दिलेल्या माहितीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.