आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणकडून ठेकेदाराची पाठराखण, ग्राहकांना शॉक, पीसी चक्रानुसार रीडिंग घेतल्याने अडचण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- महावितरणकंपनीकडून घरगुती वीज वापराच्या मीटरचे रीडिंग घेण्यासाठी ‘पीसी’ अर्थात चक्राकार पद्धतीने वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. मात्र, या नियोजनानुसार वीज मीटरचे रीडिंग घेतले जात नाही. त्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त वीजबिले मिळत आहेत.
स्लॅबनुसार रीडिंग घेतल्याने १०० युनिटपेक्षा अधिक युनिटची नोंद होते. त्यामुळे नागरिकांना दुप्पट दराने वीज घ्यावी लागते. महावितरण कंपनीकडून संबंधित ठेकेदाराची पाठराखण केली जात असल्याने ग्राहकांना नाहक भुर्दंड भरावा लागत आहे.

शहरातील ४० हजार ग्राहकांना महावितरण कंपनीकडून वीज पुरवली जाते. मात्र, संबंधित ठेकेदाराकडून नियोजित तारखांना मीटर रीडिंग घेतले जात नाही. याचा आर्थिक भुर्दंड ग्राहकांना बसत आहे. कधी मीटर रीडिंग नियोजित तारखेच्या आगोदर, तर कधी नियोजित तारीख होऊन आठवडा उलटल्यानंतर घेतले जाते. यामुळे वीजबिलामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण होते. शहरातील श्रीनगर, जळगाव रोड, अष्टविनायक कॉलनी, रेल दुनिया, शिव कॉलनी, गणेश कॉलनी, जुनी आणि नवीन हुडको कॉलनी, अयोध्यानगर, मोहितनगर, नारायणनगर तसेच भिरुड कॉलनी या भागांमध्ये चक्राकार पद्धतीनुसार मार्ग क्रमांक दोननुसार रीडिंग घेण्याच्या तारखा जून ते जुलै अशा आहेत. मात्र, १३ जुलै उलटूनही रीडिंग घेण्यात आलेले नाही. वेळेत रीडिंग घेतले जात नसल्याने वीज आकाराच्या रकमेत वाढ होते. घरगुती वीज वापरासाठी ते १०० युनिटपर्यंत रुपये ३६ पैसे प्रतियुनिट दर आहे. मात्र, १०० ते ३०० युनिटसाठी रुपये पैसे दर लागतो. वीज आकार, वीज शुल्क, इंधन समायोजन आकार आणि इतर अन्य आकाराच्या रकमेतही यामुळे वाढ होते. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. महावितरण कंपनीने वेळापत्रकानुसार रीडिंग घेतल्यास आगामी काळात आंदोलन करण्याचा इशारा प्रा. धीरज पाटील, सचिन सूर्यवंशी, अमोल पाटील, पंकज पाटील, बापू राणे, सचिन कोळी, कैलास पाटील आदींनी निवेदनाद्वारे दिला आहे.

शेतकऱ्यांना फटका
कृषिपंपांसाठीशेतकऱ्यांना दर तीन महिन्यांनी वीजबिल दिले जाते. मात्र, या बिलातही वेळेवर रीडिंग घेतले जात नसल्याने तफावत निर्माण होते. आधीच आर्थिक अडचणीत असलेले शेतकरी अतिरिक्त वीजबिल भरू शकत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांवरील अार्थिक भार वाढत आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांसोबतच कृषी ग्राहकांच्या वीज मीटरचे रीडिंगही वेळेत घेतले जावे.

१० तारखेच्या आत हवे रीडिंग
शहराचीचार भागात विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार दरमहा ते १० तारखेपर्यंत मीटर रीडिंग घेणे अनिवार्य आहे. मात्र, या प्रकारे रीडिंग घेतले जात नाही. पहिली मुदत संपल्यानंतर बिले हातात येतात. यामुळे १० रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागते. प्रा.धीरज पाटील, श्रीनगर, भुसावळ
बातम्या आणखी आहेत...