आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसमध्ये असलेल्या प्रथमोपचार पेट्या फक्त नावालाच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपत्कालीन स्थितीत बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने अनेक उपाययोजना असतात. अपघात झाल्यास वाहनांमधील प्रवासी अथवा रस्त्यावरील वाहनधारक, पादचारी जखमी होतात. अपघातप्रसंगी तातडीने प्रथमोपचाराची सुविधा बसमध्येच व्हावी, यासाठी प्रत्येक बसमध्ये प्रथमोपचार पेटी बंधनकारक केली आहे. मात्र, प्रवाशांच्या कोणत्याही सुविधेकडे दुर्लक्ष करणा-या परिवहन महामंडळाला प्रथमोपचार पेट्यांकडेही लक्ष द्यायला वेळ नाही. अपघात जेथे घडतो, तेथून जवळ दवाखाना असेलच याची खात्री नाही. तेथपर्यंत जखमी प्रवाशांना हलविण्यापूर्वी त्वरित प्राथमिक औषधोपचाराची गरज असते. मात्र, प्रथमोपचार पेट्यांचा नियम बंधनकारक असूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे स्पष्ट होत आहे. ब-याच बसमध्ये या नियमाचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. जुन्याच नव्हे तर नवीन, लांब पल्ल्याच्या बसमधील एकाही बॉक्समध्ये औषध नव्हते, तर इतर बसमध्ये बॉक्सच नसल्याचे आढळले.
औषधाऐवजी दारूची बाटली! - काही बसमध्ये रिकाम्या प्रथमोपचार पेट्या, तर बहुतांश बसमध्ये पेट्याच आढळल्या नाहीत. जळगाव-जामनेर बसमधील प्रथमोपचार पेटीत एक औषधाची बाटली आढळली; मात्र तीही रिकामी होती. एका बसचालकाच्या केबिनमध्ये दारूची बाटलीही आढळली. तीही रिचवून रिकामी केलेली होती.
औषधे गेली कुठे? - ज्याप्रमाणे औषधसाठा उपलब्ध होतो, त्यानुसार तो बसमध्ये पुरविण्यात येतो. काही महिन्यांपूर्वी सर्व पेट्यांमध्ये औषधे होती. अपघात जास्त होत नाहीत आणि त्या औषधांचा वापरही फारसा होत नाही, असे आगारातील अधिका-यांचे म्हणणे आहे? बसमध्ये औषधे देण्यात आली; पण त्याचा वापर होत नाही, तर मग ही औषध जातात कुठे, असा प्रश्न निर्माण होतो. ही औषधे, साधनसामग्री प्रवासी, नागरिकच नव्हे, तर बसचे कमर्चारीदेखील गायब करीत असल्याचे त्याच अधिका-यांनी नमूदही केले.
या बसमध्ये नाही फर्स्टएड बॉक्स
ठिकाण : नवीन बसस्थानक
*जळगाव-कानळदा (एमएच20-डीटी 3७8)
*औरंगाबाद-रावेर (एमएच 14-बीटी 1613)
*जळगाव-मेहकर (एमएच14- बीटी 6655)
*शेगाव-शिर्डी (एमएच 40-एन 9542)
*जळगाव-बाभूळगाव (एमएच 20-डी 6880)
*जळगाव-नवापूर (एमएच 14-बीटी 1315)
*ब-हाणपूर-जळगाव-नाशिक (एमएच 40- एन 9096)
*शिरपूर-धुळे-मुक्ताईनगर (एमएच 14-बीटी 0098)
*जळगाव-औरंगाबाद (एमएच 20-बीएल 0957)
*भुसावळ-अंबड (एमएच 20-बीएल 0212)
या बसमध्ये औषधांविना बॉक्स
*जामनेर-जळगाव (14 बीटी- 0070)
*जळगाव-पारोळा-धुळे (एमएच 14 बीटी 0439)
*जळगाव-रावेर (एमएच 20-डी 9507)
*जळगाव-मेहकर (एमएच 14-बीटी 0654)
*जळगाव-विदगावमार्गे भोकर (एमएच 20-डी 9505)
*जळगाव-होळनांद्रे (एम-4504)
*जळगाव-वराडसीम (एमएच 20-डी 6132)
*जळगाव-भादली (एमएच 20-डी 6186)
*जळगाव-बोरखेडा (एमएच 20-डी 8257)
*जळगाव-शिरपूर (40- एन 9026)
*जळगाव-पारोळा-धुळे (एमएच 14-बीटी 0430)
*जळगाव-वंजारीखपाट (एमएच 20-डी 8653)
*जळगाव-बाभूळगाव (एमएच 20-डी 6882)
सर्व बसेसमध्ये लवकरच औषधांसह फर्स्टएड बॉक्स - आरटीओच्या नियमानुसार सर्व बसेसमध्ये औषधी उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु ते कुठे गेले? हे सांगता येणार नाही. प्रवाशांप्रमाणेच काही कर्मचारीही ते औषध, साधनसामुग्री लांबवित असतील, ही शंका नाकारता येणार नाही. इमर्जन्सी असल्यामुळे त्या बॉक्सला कुलूपही लावता येत नाही. औषधसाठा उपलब्ध होताच तो सर्व बसेसमध्ये पुरविण्यात येईल. ज्या बसेसमध्ये बॉक्स नाहीत, त्यांच्यातही त्वरित लावण्यात येतील. अग्निशमन यंत्र मोजक्याच बसेसमध्ये लावण्यात आले होते. तेदेखील सर्व बसेसमध्ये पुरविण्यात येणार आहेत. तसेच तक्रार पुस्तिका दडवून ठेवणा-या वाहकांची माहिती घेऊन चौकशी करण्यात येईल. संबंधितांवर दंडात्मक कार्यवाई होऊ शकते. - एम.डी. देवधर, प्रभारी व्यवस्थापक , जळगाव आगार