आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळी काळात दररोज जादा बसेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन मंडळाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जळगाव आणि पुणे आगारातून दररोज जादा बसेस सोडण्यात येणार आहे. या सेवेला येत्या बुधवारपासून प्रारंभ होणार असल्याने ऐन गर्दीच्या काळात प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. तर दुसरीकडे दिवाळीत १४ दिवसांसाठी १० टक्के भाडेवाढ केल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला आर्थिक झळ बसणार आहे.

दिवाळीच्या सणातील प्रवासी वाहतूक वळवण्यासाठी महामंडळाकडून या कालावधीत विविध सेवासुविधा देण्याचा प्रयत्न केला जातो. या सणाला पुणे, मुंबईकडून जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे पुण्यातील विविध भागातून थेट बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत. यासाठी शिवाजीनगर हे मध्यवर्ती केंद्र आहे. या सेवेला बुधवारपासून सुरुवात होत आहे. यानिमित्त पुणे येथून २६ ऑक्टोबरला बसेस तर २७ ऑक्टोबरला ५, २८ ऑक्टोबरला २९ ऑक्टोबरला अशा जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. परतीच्या प्रवासासाठीही जळगावहून पुण्याला जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यात ३१ ऑक्टोबरला २, ते नोव्हेंबरदरम्यान जादा बसेस सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती आगारप्रमुख एस.बी.खडसे यांनी दिली.

ऑनलाइन आरक्षण : प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळातर्फे ऑनलाइन आरक्षणाचीही सुविधा सुरू करण्यात अाली अाहे. या सुविधेमुळे प्रवाशांची धावपळ होणार नाही.

आयत्या वेळी बस सोडण्याचे नियोजन
दिवाळीत प्रवाशांची संख्या वाढल्यास एसटी अागाराने आयत्यावेळेसही बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच मुंबई सुरत या मार्गावरही बसेस वाढवण्यात आल्या आहेत. आगार प्रमुख खडसे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...