आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नो टेन्शन! वाघूर धरणात भरपूर पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्यभरात दुष्काळामुळे जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असताना जळगावकर मात्र पाण्याबाबत सुदैवी ठरले अाहेत. एेन दुष्काळात शहराला दाेन वर्षे पुरेल एवढा पाणीसाठा वाघूर धरणामध्ये उपलब्ध अाहे. सध्या धरणात ६३.२७ टक्के जलसाठा असून, जळगावकरांनी या पाण्याची नासाडी करता बचत केल्यास हे पाणी दुष्काळी गावांसाठी उपयाेगी ठरणार अाहे. बचतीमुळे वाचलेले पाणी धरणातून इतर तहानलेल्या गावांना टँकर, अन्य उपाययाेजनांच्या माध्यमातून पुरवता येईल. त्यामुळे जळगावकरांनी पाणी बचतीसाठी पुढे येण्याची गरज आज निर्माण झाली अाहे.

जिल्ह्यातील पाचाेरा शहरात ४८, तर शिरसाेली गावात ३० दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाला अाहे. जिल्हाभरात अनेक दुष्काळी गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असताना जळगाव शहराला मात्र दाेन दिवसाअाड पाणी उपलब्ध हाेत अाहे. महापालिकेने वाघूर धरणात अारक्षित केलेल्या पाणीसाठ्यातून शहराला तब्बल दाेन वर्षे पाणी मिळणार अाहे. हा मुबलक जलसाठा नागरिकांनी जपून काटकसरीने वापरून पाण्याची बचत केल्यास ताे मे महिन्यातील अाणीबाणीच्या परिस्थितीमध्ये इतर गावांना पुरवणे सहज शक्य हाेणार अाहे. जळगावकरांनी पुढाकार घेतल्यास दुष्काळग्रस्त गावांना पाणी उपलब्ध करून देण्याच्या कामात नागरिकही खारीचा वाटा उचलू शकणार अाहेत. या प्रकल्पातील सर्वाधिक पाणी जळगावकरांसाठी अारक्षित अाहे. मात्र, त्यातील पाण्याचा वापर कमी केल्यास तेवढ्या पाण्याचा उपसाही कमी हाेऊ शकताे.

शेतीलाही पाणी : जळगाव महापालिकेला वार्षिक ४०.६२ दलघमी पाण्याची गरज असते. या वर्षासाठी महापालिकेसाठी पाटबंधारे विभागाने तेवढे पाणी अारक्षित करून ठेवले अाहे. जळगावसह जामनेरअाणि अन्य गावांची पाण्याची गरज अवघ्या ४४.१०३ दलघमी पाणीसाठ्यामध्ये पूर्ण हाेते. वाघूर प्रकल्पात सद्य:स्थितीत १५७.२३४ दलघमी पाणीसाठा उपलब्ध अाहे. बाष्पीभवन अाणि इतर अपव्यय गृहीत धरूनदेखील महापालिकेला पुढील वर्षीही एवढेच पाणी देण्याइतका साठा प्रकल्पामध्ये शिल्लक अाहे. सिंचनासाठीदेखील १००० दलघफू पाणी अारक्षित असून, त्यातील १५० दलघफू पाणी रब्बी हंगामासाठी साेडण्यात अाले अाहे.

वापरापेक्षा बाष्पीभवन अधिक.......
वाघूर प्रकल्पामधून जळगाव महापालिका, जामनेर नगरपालिका, पुनर्वसित गावे, नेरीसह अन्य गावांसाठी दरराेज दशलक्ष घनफूट पाणी उचल केले जाते, तर अर्धा (०.५) दलघफू पाणी पाझराद्वारे जमिनीत जिरते. अारक्षित जलसाठ्यातून पाण्याची उचल दलघफू असताना दरराेज ७.४१ दलघफू पाणी बाष्पीभवनामुळे उडून जाते. तापमान अाणि वाऱ्याचा वेग वाढल्यानंतर एप्रिल-मे महिन्यांत दिवसाकाठी सरासरी दलघफू पाणी बाष्पीभवनामुळे कमी हाेते.

सिंचनासाठीही पाणी देणे सहज शक्य
वाघूरमध्ये पाणीपुरवठा याेजना अाैद्याेगिक वापराशिवाय अारक्षित असलेल्या जलसाठ्याव्यतिरिक्त सिंचनासाठीदेखील हजार दलघफू पाणी देणे शक्य अाहे. मे महिन्याच्या शेवटच्या अाठवड्यात कापसासाठी अावर्तन साेडण्याचे नियाेजन अाहे. महापालिकेला पुढील वर्षीही गरज भागेल एवढे पाणी उपलब्ध अाहे.सतीश काळे, कार्यकारीअभियंता, वाघूर धरण विभाग, जळगाव
बातम्या आणखी आहेत...