Home »Maharashtra »North Maharashtra »Jalgaon» Mudra Under 25 Crore Loan For Small Businessman

‘मुद्रा’अंतर्गत लघुउद्योजकांना २५ कोटींचे कर्ज, छोट्या उद्योजकांची फरपट थांबली

ग्रामीणभागातील बारा बलुतेदार कारागीर इतर छोट्या व्यावसायिकांना उद्योग व्यवसाय उभारणीसाठी प्रोत्साहन देणारी मुद्रा योजना जिल्ह्यातील होतकरू व्यावसायिकांसाठी लाभदायी ठरत आहे.

नितीन नेरकर | Dec 23, 2015, 09:01 AM IST

  • ‘मुद्रा’अंतर्गत लघुउद्योजकांना २५ कोटींचे कर्ज, छोट्या उद्योजकांची फरपट थांबली
जळगाव- ग्रामीण भागातील बारा बलुतेदार कारागीर इतर छोट्या व्यावसायिकांना उद्योग व्यवसाय उभारणीसाठी प्रोत्साहन देणारी मुद्रा योजना जिल्ह्यातील होतकरू व्यावसायिकांसाठी लाभदायी ठरत आहे.
५० हजारांपासून ते पाच लाखांपर्यंत तीन श्रेणीत कर्जाचा पुरवठा करणारी मुद्रा अर्थात माइक्रो युनिट डेव्हलपमेंट अॅन्ड रिफाइनेन्स एजन्सी या योजनेची अंमलबजावणी सर्वच राष्ट्रीयकृत बँकांमधून होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत लघु उद्योजकांना प्रचलित व्याजदरानुसार २५ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया मेकिंग अंतर्गत स्थानिक पारंपरिक व्यवसायाच्या प्रोत्साहनासाठी महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सूक्ष्म लुघ कर्ज पुरवठा करण्यासाठी मुद्रा योजना सुरू केली आहे. त्या अंतर्गत ब्युटी पार्लर, सलून, सुतारकाम, लोहारकाम, शिवणकाम, फॅब्रिकेशन, लाँड्री, भाजीपाला विक्री केंद्र, कृषीप्रक्रिया, पशुखाद्य निर्मिती, बेकरी, कॅन्टीन, चहा स्टॉल, डेअरी, रिक्षा वाहतूक, हस्तकला, एम्ब्रॉयडरी आदी छोटे-मोठ्या व्यावसायिकांना बँकेद्वारे कर्जाचा पुरवठा करण्यात आला आहे. व्यवसायाच्या प्रस्तावानुसार मिळणाऱ्या विनातारण कर्जामुळे छोट्या व्यावसायिकांची फरपट थांबली आहे.

ते वर्षांची मुदत
मुद्राअंतर्गत व्यावसायिकांना शिशू, किशोर तरुण या तीन प्रकारात आलेल्या प्रस्तावानुसार विनातारण पाच ते सात वर्षांच्या मध्यम मुदतीसाठी कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. यात शिशूसाठी ५० हजार, मुदतीच्या आत कर्जाची व्यवस्थित कर्जफेड केल्यास किशोर अंतर्गंत ५० ते पाच लाख तरुण या श्रेणीत पाच ते १० लाखांपर्यंत कर्जाची उपलब्धता आहे. शिशू कर्जामुळे बेरोजगार तरुण, महिलांना गृहाेद्योग, पारंपरिक व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन मिळू शकते.

एका दिवसात कर्ज
अॅरोप्लॉन्टसाठीसेंट्रल बँकेच्या कुसुंबा शाखेतून मी मुद्रा योजनेतून ५० हजारांचे दहा टक्के दराने कर्ज घेतले. यापूर्वी व्यवसाय उभारणीसाठी कर्ज घेतांना बँकांकडून जो त्रास व्हायचा तो मुद्रा योजनेमुळे झाला नाही. प्रस्तावानुसार एका दिवसात बँकेने कर्ज मंजूर केले. या पैशातून चिलिंगचे मशीन घेतले. कर्जासाठी फक्त आधारकार्ड, कोटेशन, १०० रुपयांचा मुद्रांक एवढीच कागदपत्रे लागली. समाधान हटकर, कुसुंबा,ता. जळगाव

विनातारण कर्ज
ग्रामीणभागातीलपारंपरिक व्यवसाय लघुउद्योगांच्या प्रोत्साहनासाठी मुद्रा योजनेची अंमलबजावणी होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे २५ कोटींचे कर्ज वाटप झाले. बँकांमध्ये आलेल्या व्यवसायाच्या प्रस्तावानुसार बँकेतील पतनुसार व्हेरिफिकेशन होऊन समोरच्या व्यक्तीस विनातारण कर्ज दिले जाते. एस. एच. चव्हाण, अग्रणीबँक, जळगाव
शासकीय योजना

Next Article

Recommended