आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mudssar Habib Patel Gose To Jalagoan People Bank Shri

मुदस्सर हबीब पटेल ‘जळगाव पीपल्स बँक श्री’चा विजेता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डिस्ट्रिक्ट बॉडीबिल्डर्स असोसिएशन व श्री साई-बजरंग जिमतर्फे ‘जळगाव पीपल्स बॅँक श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा झाली. या स्पर्धेचे उद्घाटन पीपल्स बॅँकेचे माजी संचालक व स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष मधुकर वारके यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत ‘पीपल्स बॅँक श्री’चा विजेता मुदस्सर हबीब पटेल ठरला.

राष्ट्रीय खेळाडू दिनेश देवरे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले. मुदस्सर पटेल याला पीपल्स बॅँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील यांच्या हस्ते करंडक, रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून संतोष सोनवणे, लक्ष्मण दहीभाते, नासीर शेख दादामियॉँ, सतीश देशमुख, चंद्रकांत सपकाळे, दिनेश खामकर, संदीप मराठे, गोपाल सुरवाडकर उपस्थित होते. जिल्ह्यातून 75 शरीरसौष्ठवपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. पंच म्हणून संतोष सोनवणे, नासीर शेख दादामियॉँ, सतीश देशमुख (पाचोरा), लक्ष्मण दहीभाते, स्टेज मार्शल म्हणून संदीप मराठे, विवेक चतुर यांनी, तर गुणलेखक म्हणून चंद्रकांत सपकाळे, श्रीकांत धानापुने, सागर जोशी व स्वप्निल साबळे यांनी काम पाहिले. महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स असोसिएशनचे संघटन सचिव मोहन चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.

स्पर्धेचा निकाल असा :

0 ते 55 किलो वजन गट- मो.काझी (प्रथम, स्काय जिम, भुसावळ), अनिल राठोड (द्वितीय, एम.एम.कॉलेज, पाचोरा), अजय गारले (तृतीय, कोरोनेशन हेल्थ क्लब, भुसावळ), आरिफ शफी मणियार (चतुर्थ, एम.एम.कॉलेज, पाचोरा), अमजद खान (पंचम, अशोका जिम, जळगाव);

56 ते 60 किलो वजन गट- अश्पाक पटेल (प्रथम, रेक्स जिम, भुसावळ), मयूर अहिरे (द्वितीय, एम.एम.कॉलेज, पाचोरा), राजेंद्रकुमार सपकाळे (तृतीय, साई-बजरंग जिम, जळगाव), यतीश छत्रपती (चतुर्थ, स्काय जिम, भुसावळ), किरणसिंग परदेशी (पंचम, साई-बजरंग जिम जळगाव);

61 ते 65 किलो वजन गट- मुदस्सर हबीब पटेल (प्रथम, जैन स्पोर्ट्स अकॅडमी, जळगाव), गणेश चौधरी (द्वितीय, अशोका जिम, जळगाव), सुरज परिहार (तृतीय, नॅशनल हेल्थ क्लब, जळगाव), आश्विन चौरसिया (चतुर्थ, स्काय जिम), विनोद कोळी (पंचम, एम.एम.कॉलेज, पाचोरा);

65 किलोवरील वजन गट- अब्दुल अनिस (प्रथम, साई-बजरंग जिम), प्रमोद जाधव (द्वितीय, स्काय जिम), अनिरुद्ध ठेंगडी (तृतीय, कोरोनेशन हेल्थ क्लब), अनिल सोनवणे (चतुर्थ, एम.एम.कॉलेज, पाचोरा), शेख मोहसिन गुलाब (पंचम, स्काय जिम); तसेच ‘बेस्ट पोझर’ किताब विजेता- अब्दुल अनिस (साई-बजरंग जिम), ‘मोस्ट इम्प्रूव्ह’ किताब विजेता- अश्पाक पटेल (रेक्स जिम).