आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चित्रांतून दिला ‘गो ग्रीन’चा संदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मूजे महाविद्यालयाच्या ओजस्विनी कला विभागातर्फे लेवा बोर्डिंग येथे तीनदिवसीय शॅडो मान्सून चित्रप्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी कल्पकतेचा वापर करून नावीन्यपूर्ण चित्रांचे सादरीकरण केले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवचरित्र अभ्यासक दुर्गादास नेवे, चोपडा येथील ललित कला केंद्राचे राजेंद्र महाजन, धुळे येथील स्कूल ऑफ आर्टचे प्राचार्य अनिल वाघ, शिल्पकार रमाकांत सूर्यवंशी, औरंगाबाद येथील शासकीय कला महाविद्यालयाचे भरत गडरी, यशवंत कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य अशोक तांबटकर, केंद्रीय विद्यालय (उमवि)चे प्राचार्य एम.एन.र्शीकुमार, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील, नाट्यकलावंत शरद पांडे उपस्थित होते. ओजस्विनी कला विभागाच्या एमएफए अभ्यासक्रमात असलेल्या 20 विद्यार्थ्यांनी आपली चित्रे या प्रदर्शनात मांडली आहेत. त्यांना प्राचार्य अविनाश काटे, प्रा.योगेश लहाने, प्रा.पुरुषोत्तम घाटोळ, प्रा.हिरकणी फेगडे, वैशाली सित्रे, रतिलाल राठोड यांचे सहकार्य मिळाले.
पर्यावरण जागृती
ओजस्विनी कला विभागातर्फे हे वर्ष ‘गो ग्रीन’ म्हणून साजरे करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘इन्स्टॉलेशन’ या कलाकृतींतून‘गो ग्रीन’चा संदेश देण्यात आला. तसेच झाडे लावली नाहीत, तर पृथ्वीवरील नैसर्गिक पाणीसाठा संपून दूषित पाणी वापरण्याची वेळ येईल. त्यामुळे झाडे लावण्याचा संदेश देण्यात आला. या वेळी वाळूवर विविध रंगांच्या पाण्याचे ग्लास ठेवण्यात आले होते.